नाशिक : प्रतिनिधी
संपुर्ण महाराष्ट्रात गाजत असलेले “शिवपुत्र संभाजी” ह्या महानाट्याचे आयोजन प्रथमच नाशिक शहरात होत आहे. महेंद्र महाडिक लिखित दिग्दर्शित या महानाट्यात डॉक्टर अमोल कोल्हे संभाजी महाराजांच्या प्रमूख भूमिकेत आहेत. १८ एकर परिसरात, तीन मजली सेट, घोडे – तोफा आणि जवळ जवळ २०० कलाकारांच्या संचासह हे महानाट्य सादर होणार आहे.
दिनांक २१ ते २६ जानेवारी २०२३ या कालावधीत रोज सायंकाळी ६ वाजता नाशिक तपोवन येथील मोदी मैदान (कै बाबूशेठ केला मैदान) येथे हे महानाट्य सादर होणार आहे. डोळे दिपवणाऱ्या ह्या महानाट्याबरो
सशुल्क असणाऱ्या ह्या महानाट्यासाठी दहा हजार प्रेक्षकांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. या महानाट्याची तिकिटं ऑनलाईन bookmyshow वर तसेच महाकवी कालिदास कलामंदिर – शालिमार, रेमंड शॉप – शरणपूर रोड, रेमंड शॉप – बिटको चौक, नाशिक रोड येथे उपलब्ध असणार आहेत. नाशिक जिल्हा तसेच उत्तर महाराष्ट्रातील रसिकांसाठी हि एक पर्वणीच आहे आणि या भव्य दिव्या महानाट्याला तितकाच अभूतपूर्व प्रतिसाद मिळेल असा विश्वास आयोजकांनी या वेळी व्यक्त केला.
स्थानिक कलावंताना संधी
शिवपुत्र संभाजी या महानाट्यात स्थानिक कलावंतानाही सहभागी करून घेण्यात येणार असल्याची माहिती अभिनेते अमोल कोल्हे यांनी दिली.