नाशिक

शिवपुत्र संभाजी महानाट्याचा प्रयोग आता नाशकात

नाशिक : प्रतिनिधी
संपुर्ण महाराष्ट्रात गाजत असलेले “शिवपुत्र संभाजी” ह्या महानाट्याचे आयोजन प्रथमच नाशिक शहरात होत आहे. महेंद्र महाडिक लिखित दिग्दर्शित या महानाट्यात डॉक्टर अमोल कोल्हे संभाजी महाराजांच्या प्रमूख भूमिकेत आहेत. १८ एकर परिसरात, तीन मजली सेट, घोडे – तोफा आणि जवळ जवळ २०० कलाकारांच्या संचासह हे महानाट्य सादर होणार आहे.
दिनांक २१ ते २६ जानेवारी २०२३ या कालावधीत रोज सायंकाळी ६ वाजता नाशिक तपोवन येथील मोदी मैदान (कै बाबूशेठ केला मैदान) येथे हे महानाट्य सादर होणार आहे. डोळे दिपवणाऱ्या ह्या महानाट्याबरोबरच या मैदानात शिवसृष्टी निर्माण करण्यात येणार आहे. या शिवसृष्टीत महाराजांचे स्वराज्याचे संकल्प पूर्णत्वास नेणारे विविध किल्ले, गड यांच्या आकर्षक आणि मूर्तिमंत प्रतिकृती रसिकांना एकत्रित बघता येणार आहे. महिलांच्या विविध अल्पगटाद्वारे येथे ५० हुन अधिक स्टॉल उभारण्यात येणार आहे. त्यात विविध खाद्य पदार्थंच्या स्टॉल्सचा समावेश असणार आहे. या निमित्ताने नाशिककरांना सहकुटुंब मित्रपरिवारासह एक संपूर्ण दिवस गौरवशाली इतिहासाचे साक्षीदार होण्याचे भाग्य मिळणार आहे.

सशुल्क असणाऱ्या ह्या महानाट्यासाठी दहा हजार प्रेक्षकांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. या महानाट्याची तिकिटं ऑनलाईन bookmyshow वर तसेच महाकवी कालिदास कलामंदिर – शालिमार,  रेमंड शॉप – शरणपूर रोड, रेमंड शॉप – बिटको चौक, नाशिक रोड येथे उपलब्ध असणार आहेत. नाशिक जिल्हा तसेच उत्तर महाराष्ट्रातील रसिकांसाठी हि एक पर्वणीच आहे आणि या भव्य दिव्या महानाट्याला तितकाच अभूतपूर्व प्रतिसाद मिळेल असा विश्वास आयोजकांनी या वेळी व्यक्त केला.

स्थानिक कलावंताना संधी

शिवपुत्र संभाजी या महानाट्यात स्थानिक कलावंतानाही सहभागी करून घेण्यात येणार असल्याची माहिती अभिनेते अमोल कोल्हे यांनी दिली.

Ashvini Pande

Recent Posts

छगन भुजबळ मंत्रिमंडळात,उद्या मुंबईत शपथविधी

छगन भुजबळ मंत्रिमंडळात उद्या मुंबईत शपथविधी नाशिक : प्रतिनिधी मंत्रिपद न मिळाल्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून…

9 hours ago

राशीभविष्य

12 राशींचे राशीभविष्य मेष रास  मेष राशीच्या लोकांनो आज प्रवास करताना कोणताही धोका पत्करू नका,…

16 hours ago

झाडे उठली जीवावर!

रस्त्याने जाणेही ठरतेय धोकादायक नाशिक : प्रतिनिधी शहरातील धोकादायक झाडांचा प्रश्न ऐरणीवर आला असून, महापालिकेचा…

16 hours ago

अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू

नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयामार्फत उच्च माध्यमिक प्रथम वर्ष…

16 hours ago

‘सचेत’ अ‍ॅप देणार आपत्तीची माहिती

अ‍ॅपचा वापर करण्याचे पंतप्रधानांकडून आवाहन नाशिक : प्रतिनिधी नागरिकांना नैसर्गिक आपत्तीसह ऊन व पावसाची माहिती…

17 hours ago

वडनेरला द्राक्ष उत्पादकाची पंधरा लाखांची फसवणूक

पिंपळगावच्या व्यापार्‍याविरोधात गुन्हा दाखल चांदवड : वार्ताहर तालुक्यातील वडनेरभैरव येथील द्राक्ष उत्पादक शेतकर्‍याची तब्बल 15…

17 hours ago