बँकेतून मिळालेले जादाचे एक लाख रुपये शेतकऱ्याने केले परत

बँकेतून मिळालेले जादाचे एक लाख रुपये शेतकऱ्याने केले परत

लासलगाव:-समीर पठाण

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या लासलगाव शाखेतून तब्बल एक लाख रुपयांची जादा मिळालेली रक्कम पाचोरे बु ता निफाड येथील शेतकऱ्याने बँकेला परत आणून देत प्रामाणिकपणाचा प्रत्यय घडविला. स्टेट बँक ऑफ इंडिया च्या लासलगाव शाखेतून तब्बल एक लाख रुपयांची जादा मिळालेली रक्कम पाचोरे बु ता निफाड येथील शेतकरी
अंकुश शंकर आंधळे यांनी बँकेला परत आणून देत प्रामाणिकपणाचा प्रत्यय घडविला.स्टेट बँक ऑफ इंडिया च्या लासलगाव शाखेतून शेतकरी अंकुश शंकर आंधळे
यांना बँकेच्या कॅशिअरकडून पैसे देताना चुकून एक लाख रुपये जास्त दिले गेले.

अंकुश शंकर आंधळे यांनी सदर मिळालेली रक्कम घरी घेऊन गेल्यावर त्यांना एक लाख रुपये जास्त मिळाल्याचे त्यांच्या लक्षात आले त्यांनी लगेचच जादा मिळालेले एक लाख रुपये स्टेट बँक ऑफ इंडिया च्या लासलगाव शाखेतून परत आणून दिले.बँकेच्या शाखा अधिकाऱ्यांनी शेतकरी अंकुश शंकर आंधळे यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक करून शाबासकीची थाप दिली

शेतकरी सध्या आर्थिक अडचणीत आले आहे.त्यामुळे त्यांना पैशाची चणचण भासत आहे.एक एक पैसा जमा करताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागते.मात्र शेतकरी अंकुश शंकर आंधळे यांनी जादाचे मिळालेले एक लाख रुपये बँकेला परत करून प्रामाणिकपनाचा परिचय दिला

Bhagwat Udavant

Recent Posts

अमेरिकेचा मोठा शत्रू

अमेरिकेचा मोठा शत्रू अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुमारे ७५ देशांवर लादलेल्या जबर आयात शुल्कामुळे…

2 hours ago

सप्तशृंग गडावर भाविकांच्या गर्दीचे तुफान

नाशिक: प्रतिनिधी सप्तशृंगी मातेच्या दर्शनासाठी सप्तशृंग गडावर आज भाविकांची मोठी गर्दी उसळली होती, व्यवस्थापन यांच्या…

4 hours ago

सिन्नर – शिर्डी मार्गावर दातली फाट्यावर दोन दुचाकींचा अपघात; तीन जण गंभीर जखमी

सिन्नर : प्रतिनिधी सिन्नर - शिर्डी मार्गावर दोन दुचाकींची समोरासमोर जोराची धडक होऊन झालेल्या अपघातात…

10 hours ago

सिन्नरला उद्यापासून भैरवनाथ महाराज यात्रोत्सव

सिन्नर : प्रतिनिधी शहरातील ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराजांच्या यात्रोत्सवास शुक्रवारी (दि. 11) प्रारंभ होत आहे.…

11 hours ago

चैत्रोत्सवादरम्यान भाविकांची दर्शनासाठी गर्दी

सप्तशृंगगड ः वार्ताहर लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री सप्तशृंगीदेवीचा चैत्रोत्सवासाठी राज्याच्या विविध भागातून म्हणजे मध्य…

11 hours ago

पत्नीला स्वर्गलोकी पाठवत मी पण जात आहे… नाशिकरोडला निवृत्त मुख्याध्यापकाने उचलले टोकाचे पाऊल

पत्नीला स्वर्गलोकी पाठवत मी पण जात आहे... नाशिकरोडला निवृत्त मुख्याध्यापकाने उचलले टोकाचे पाऊल नाशिकरोड :…

1 day ago