संगमनेर ः प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची पहिली एसटी बस नगर-पुणे मार्गावर धावली होती. एसटी महामंडळाच्या वर्धापन दिनाचे निमित्त साधून आता पुन्हा एकदा या मार्गावर परिवहन मंडळाची पहिली इलेक्ट्रिक ’शिवाई’ बस 1 जूनला धावणार आहे.
या वर्षाअखेर एसटी महामंडळाच्या तापामध्ये सुमारे एक हजार इलेक्ट्रिक बस आणि 2000 सीएनजीवर चालणार्या बस दाखल होत आहेत. यातील दीडशे बसेस पहिल्या टप्प्यात एक जूनपर्यंत उपलब्ध होण्याची शक्यता असून ज्या मार्गावर राज्यातील पहिली एसटी बस धावली होती, त्याच मार्गावर पहिली इलेक्ट्रिक ’शिवाई’ बस चालवण्याचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे. येत्या 1 जून रोजी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचा वर्धापन दिन असून या दिवशी ही बस धावणार असल्याची आनंददायी वार्ता समोर आली आहे.
दीर्घकाळ सुरू असलेला एसटी कामगारांचा संप मिटल्यानंतर राज्यात बस सेवा पूर्ववत झाली असली तरी ग्रामीण भागातील बससेवा अद्यापही पूर्ण क्षमतेने सुरू झालेली नाही. त्यातच सुट्ट्यांच्या काळामध्ये प्रवासी गाड्यांना मोठी मागणी असते. मात्र सध्या एसटी महामंडळाकडे कर्मचारी आहेत, प्रवासी आहेत मात्र एसटी बसेस पूर्ण क्षमतेने उपलब्ध नाहीत. अशी स्थिती आहे एसटी बसच्या तुटवड्यामुळे ग्रामीण भागातील प्रवासी सेवा अद्यापही सुरू झाले नसल्याने याचा आढावा घेण्यासाठी परिवहन मंत्री अनिल परब यांनी शुक्रवारी महामंडळातील सर्व विभाग नियंत्रणाची विशेष बैठक बोलावली होती या बैठकीत त्यांनी उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी जाणार्या सर्वसामान्य प्रवाशांसाठी वाहतुकीचे नियोजन तातडीने करण्याच्या सूचना अधिकार्यांना केल्या. तसेच इलेक्ट्रिक बस संबंधी माहिती दिली.
इंधनाच्या वाढत्या किमतीमुळे दिवसेंदिवस एसटी प्रवास महाग होत चालला आहे. देशातील सार्वजनिक प्रवासी वाहतूकीमध्ये पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक गाड्यांचा अधिकाधिक समावेश करण्यासाठी केंद्र सरकारने फेम योजना सुरु केली आहे. या योजनेनुसार इलेक्ट्रिक बससाठी केंद्राकडून सवलतदेखील दिली जात आहे. सरकारच्या या या योजनेअंतर्गत आता एसटी महामंडळाच्या ताङ्गयामध्ये 1000 इलेक्ट्रिक बस आणि 2000 सीएनजीवरील बसेस दाखल होणार आहे. यातील दीडशे बसेसचा पहिला टप्पा जूनमध्ये येणार असून उर्वरित बस वर्षाअखेर एसटी महामंडळाच्या ताफ्यात दाखल होतील.
शहरी भागामध्ये सीएनजी मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याने मुंबई-पुणे-नाशिक आणि अन्य शहरी मार्गावर सीएनजीवरील बसेस सुरू केल्या जात आहेत. ग्रामीण भागात मात्र डिझेलवर चालणार्या बसेस पूर्वीप्रमाणेच सुरू असतील. राज्य परिवहन मंडळाच्या ताब्यात इलेक्ट्रिक आणि सीएनजी वरील बसेस दाखल होत असल्याने प्रवासी मागणीनुसार एसटी बस उपलब्ध होणार आहेत. असे असले तरी वर्धापन दिनी एक जूनला पुणे-नगर मार्गावर धावणार्या शिवाई बसची जिल्हावासियांना प्रतीक्षा आहे. राज्यातील पहिल्या एसटी बस सोबत आता पहिल्या इलेक्ट्रिक बसचा शुभारंभदेखील याच मार्गावर होत आहे.
गाडीत पैसे असल्याच्या संशयावरून राडा साकोरा येथे गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठी चार्ज नांदगांव /…
नाशिक : प्रतिनिधी नाशिक मध्यचे दोन्ही उमेदवार देवयानी फरांदे आणि वसंत गीते एकाच वेळी आल्याने…
नांदगाव: येथील मतदार संघात आज समीर भुजबळ आणि सुहास कांदे यांच्यात आज पुन्हा राडा झाला.…
नाशिक: लोकशाहीचा उत्सव असलेल्या मतदानास सकाळी 7 वाजेपासून सुरुवात झाली आहे, मतदानाचा हक्क बजावत अनेकांनी…
जिल्ह्यात पहिल्या दोन तासात ६. ८९ टक्के मतदान नाशिक मध्य मध्ये दोन तासात सर्वाधिक…
निफाड:- प्रतिनिधी निफाड विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उ बा ठा चे उमेदवार माजी आमदार अनिल कदम…