शैक्षणिक वर्षाला प्रारंभ, नवागतांचे पुष्प देऊन स्वागत
नाशिक : प्रतिनिधी
नवीन शैक्षणिक वर्षाला आजपासून प्रारंभ होणार आहे.नवागतांचे पुष्प देऊन, तसेच औक्षण करून स्वागत केले जाणार आहे. शाळांचा प्रवेशोत्सव जोरदार करण्याच्या सूचना शिक्षण विभागाने यापूर्वीच शाळांना दिल्या आहेत. त्यामुळे शाळांचे वर्ग सजविण्यात आले आहे. नवीन शैक्षणिक वर्षाला प्रारंभ लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे शालेय स्तरावर जोरदार तयारी केली जात आहे. यंदा शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश देण्यात येणार आहे.
नाशिक : आज शाळेचा पहिला दिवस. काल शालेय खरेदीसाठी झालेली विद्यार्थी, पालकांची गर्दी. (छायाचित्र : रविकांत ताम्हणकर)
शालेय प्रवेशोत्सवाच्या निमित्ताने राज्यभर शालेय प्रवेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी (दि.16) बागलाण तालुक्यातील तुंगणदिगर येथे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे तर इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेशोत्सव होणार आहे.
शालेय शिक्षण विभागाने राज्यात शाळा प्रवेशोत्सव उपक्रम आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमांतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सर्व मंत्री, राज्यमंत्री, लोकप्रतिनिधी आणि शासकीय अधिकारी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना भेट देऊन विद्यार्थ्यांना विविध शासकीय योजनांची माहिती देतील. विद्यार्थ्यांना सर्व माध्यमांची सर्व विषयांची पाठ्यपुस्तके शाळेच्या पहिल्या दिवशी मोफत वितरीत करण्यात येतील. शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील पहिली ते आठपर्यंतच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना दोन गणवेश, एक जोडी बूट, दोन जोडी पायमोजे शासनाकडून शाळा व्यवस्थापन समितीमार्फत देण्यात येतील.
विद्यार्थ्यांना मिळणार फोर्टिफाइड तांदूळ
शैक्षणिक गुणवत्तेसाठी पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना तांदळाबरोबरच धान्यादी मालाचा पुरवठा करून नियमित आहार उपलब्ध करून देण्यात येतो. तसेच नियमित आहारासोबत आठवड्यातून एकदा पूरक आहार देण्यात येतो. या योजनेमध्ये केंद्र शासनाच्या भारतीय अन्न महामंडळामार्फत फोर्टिफाइड तांदूळ उपलब्ध करून देण्यात येतो. त्यामुळे विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढत आहे.
पहिल्याच दिवशी मुलांना पुस्तके
सन 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी नाशिक जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण आज, दि. 16 शाळेच्या पहिल्याच दिवशी करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या नियोजनबद्ध कार्यवाहीमुळे यंदादेखील पुस्तक वाटप वेळेत आणि प्रभावीपणे पार पडणार आहे. जिल्ह्यातील 4,238 शाळांमधील 4,88,321 विद्यार्थ्यांसाठी एकूण 28,57,633 पाठ्यपुस्तकांची मागणी करण्यात आली होती. यांपैकी 28,56,375 प्रती प्राप्त होऊन त्या 100% वाटपासाठी शाळांपर्यंत पोहोचवण्यात आल्या आहेत. गटस्तरावरून शाळास्तरापर्यंत पुस्तकांचा पुरवठा पूर्ण करण्यात आला असून, आता विद्यार्थ्यांच्या हस्ते वितरण होणार आहे. शिक्षण विभाग, समग्र शिक्षा अभियान आणि स्थानिक शैक्षणिक अधिकारी यांनी या उपक्रमात महत्त्वाची भूमिका बजावली असून, ‘पहिल्या दिवशी पुस्तक हातात’ हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला आहे.
पुरुषोत्तम नाईक दि. 17 ते 23 ऑगस्ट 2025 मेष : सुखवार्ता कळतील या सप्ताहात रवी,…
मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय चेहरा, ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे वयाच्या 68 व्या वर्षी…
देशभरातून आमंत्रणे; महाराष्ट्राच्या भक्तिभावाला नवी दिशा पंचवटी : प्रतिनिधी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा प्राण म्हणजे गणेशोत्सव.…
गिरीश महाजन यांच्या दाव्यानंतर भुजबळांचेही प्रत्युत्तर नाशिक : प्रतिनिधी नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद पुन्हा एकदा ऐरणीवर…
बोलठाण : प्रतिनिधी नांदगाव तालुक्यातील जातेगावपासून सात किलोमीटर अंतरावरील पिनाकेश्वर महादेव घाटात रविवारी (दि.17) सायंकाळी…
वीजचोरी रोखण्यास मदत; महावितरणाच्या वरिष्ठ अधिकार्यांना विश्वास निफाड : विशेष प्रतिनिधी विजेची हानी तथा गळती,…