आमच्याकडे का पाहतोय विचारत टोळक्याचा दामपत्यावर हल्ला

 

जेलरोड परिसरात घटना नाशिकरोड ठाण्यात गुन्हा दाखल

नाशिकरोड : प्रतिनिधी

नाशिक रोड आणि उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही दिवसापासून गुन्ह्याचे प्रमाण वाढले आहे. दरम्यान तिघा जणांनी आमच्याकडे का बघतोस या कारणावरून पती-पत्नीवर हल्ला करून पतीला गंभीर जखमी केल्याची घटना जेलरोड परिसरात घडली आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात तीन जनाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कैलास जाधव (रा.सोनवणे मळा मरी माता मंदिराजवळ नाशिकरोड) हे व त्यांची पत्नी जेलरोड येथील
जय किराणा स्टोअर्स मध्ये किराणा घेत होते. यावेळी सशयित अजय अशोक सिंग व व त्याचे दोन जोडीदार आले व त्यांनी कैलास जाटव यांना म्हणाले की तू आमच्याकडे का बघतोस असे कारण काढून कैलास जाटव व त्यांच्या पत्नीला शिवीगाळ करून बेदम मारहाण केली त्यानंतर एकाने कैलास जाटव यांच्यावर धारदार शास्त्राने हल्ला करून गंभीर जखमी केले या घटनेनंतर सिंग व त्याचे दोन जोडीदार फरार झाले. दरम्यान या घटनेप्रकरणी जाटव यांच्या पत्नीने नाशिकरोड पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध तक्रार दाखल केली असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली हवालदार कुराडे हे करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *