अंगावर झाड पडल्याने एकाचा जागीच मृत्यू
सातपूर: प्रतिनिधी
सातपूर शिवाजीनगर येथे दुचाकीवर गुलमोहरचे झाड पडल्याने दुचाकीस्वार तुषार रघुनाथ पवार यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला.
सातपूर शिवाजीनगर येथून बुधवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास कामावरून घरी जात असतांना गुलमोहोराचे झाड दुचाकीवर पडल्याने यात दुचाकीस्वार तुषार रघुनाथ पवार यांच्या डोक्याला गंभीर मार लागला. त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. घटना घडल्यानंतर घटनेची स्थानिकांनी अग्निशमन दलाला कळवली असता अग्निशामन दल तसेच त्यांची कर्मचारी दाखल झाली होती.घटनास्थळी स्थानिक पोलीस अधिकारी तसेच कर्मचारी दाखल झाले होते. अग्नीशामक दलाचे कर्मचारी यांनी रस्त्यावरील झाड काढून वाहतुक सुरळीत केली.