अग्रलेख

धार्मिक राष्ट्रवादाचे महत्त्व

सन 2047 पर्यंत भारताला गजवा-ए-इस्लाम करण्याचे प्रयत्न होत असताना जेन-झी (1997 ते 2012 या कालावधीत जन्मलेले) आणि जेन अल्फा (2013 ते 2025 या कालावधीत जन्मलेले) या पिढ्यांच्या खांद्यावर मोठे दायित्व सरकारने सोपवले आहे ते म्हणजे, विकसित भारत 2047 चे. पंतप्रधान मोदी यांच्या वक्तव्यातून तरुणांमध्ये आर्थिक राष्ट्रवादाचे बीज अंकुरत आहे आणि त्यांना त्या दिशेने पुढे सरसावण्यासाठी प्रेरित करत
आहे.
आजचे जागतिक राजकारण अर्थकारणावर केंद्रित असल्याने भौतिक विकास होत आहे. केवळ आर्थिक क्षमतेने राष्ट्र पुढे जाऊ शकत नाही. अशा राष्ट्राची झपाट्याने प्रगती होते, पण त्याहून अधिक गतीने ते राष्ट्र रसातळाला जाते. याची दोन मोठी उदाहरणे म्हणजे नाझी जर्मनी आणि सोविएत संघ. राष्ट्राला व राष्ट्रातील जनसमूहाला एका वैचारिक, भावनिक आणि आध्यात्मिक माळेत गोवण्यासाठी एका समान संस्कृतीचे असणे आवश्यक असते. असे न झाल्यास राष्ट्राची कशी वाताहत होते हे वरील दोन उदाहरणांवरून दिसून येते. कोणत्याही प्रकारे देशाची वाताहत होऊ नये म्हणून शासन आर्थिक आणि सांस्कृतिक राष्ट्रवाद अशा दोन्हींवर भर देत आहे.
अमेरिकी वंशाचे ऑस्ट्रेलियातील प्राध्यापक सॉल्वेतोर बेबोन्स यांनी लिहिलेल्या धर्म डेमोक्रसी या पुस्तकात भारतात लोकशाही ही सहस्त्रावधी वर्षापासून अस्तित्वात असण्यामागील एक कारण आहे. राष्ट्रीय एकता जी सनातन हिंदू धर्माद्वारे नागरिकांना एकत्र आणते. आपली मुळे एक असल्याची सामायिक भावना भारतीय जनतेत असल्यानेच लोकशाही टिकली आहे.
स्वातंत्र्यानंतर ही भावना नष्ट करण्याचा येनकेनप्रकारेन प्रयत्न झाला. निधर्मीपणाच्या नावाखाली राष्ट्रीय एकतेवर ग्रहण आणण्याचा प्रयत्न होत आहे. हिंदू वैचारिक आतंकवादाचे बळी ठरले आहेत आणि संस्कृतीपासून विन्मुख झाले आहेत. त्यांना परत मार्गावर आणण्याचे, सुधारण्याचे प्रयत्न चालू झाले आहेत, ते आर्थिक, भौगोलिक आणि सांस्कृतिक राष्ट्रवादाचे पुनर्जागरण करून. हिंदूंवर भारत, पाकिस्तान, बांगलादेश आणि अन्यत्र अत्याचार, आक्रमणे सुरू आहेत. याचे कारण आहे धार्मिक राष्ट्रवादाचा अभाव. जेव्हा एखादी संस्कृती आणि सभ्यता धोक्यात येते तेव्हा तिच्याही मुळाशी असलेल्या धर्माचे आणि त्याच्या धर्मीयांचे रक्षण करणे गरजेचे असते.
कोणतीही संस्कृती भाषा, चालीरीती, परंपरा आदींच्या आधारे विकसित होत असते. या सर्व सूत्रांचा गाभा धर्मात असतो. त्याचे रक्षण करण्यासाठी धार्मिक राष्ट्रवादाचा उदय होणे आवश्यक आहे. धर्माचरण, धर्मशिक्षण आणि आध्यात्मिक साधनेला राजाश्रयाद्वारे प्रोत्साहन देणे गरजेचे असते. धार्मिक राष्ट्रवादाद्वारे संस्कृती, भूगोल आणि अर्थ यांचे रक्षण शक्य होते. धार्मिक राष्ट्रवादाच्या अभावामुळेच आज हिंदूंवर अत्याचार होत आहेत. त्यासाठी हिंदू राष्ट्राची स्थापना करणे गरजेचे आहे. हिंदू राष्ट्राची स्थापना झाल्यावर जेन-झी आणि जेन-अल्फा पिढ्यांच्या हातून एक कायमस्वरूपी महाशक्तीचा उदय होऊ शकतो.

The importance of religious nationalism

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

दादांची अकाली एक्झिट ! जिल्हा शोकसागरात

सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…

5 hours ago

स्मार्ट पार्किंगचे घोडे अडलेलेच!

टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…

6 hours ago

बांगलादेश क्रिकेट बोर्डाचा आत्मघातकी निर्णय

बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्‍या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…

6 hours ago

अजितदादांची साथ नेहमी स्मरणात राहील!

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…

6 hours ago

पवार परिवारावर आघात

महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…

6 hours ago

मीठसागरे शिवारात बिबट्या मादी जेरबंद

सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…

6 hours ago