जमिन वाटपाचा वाद विकोपाला पोचला अन पुढे घडले असे काही की….
दिंडोरी : प्रतिनिधी
दिंडोरी तालुक्यातील उमराळे खुर्द येथे भावा भावांच्या वडिलोपार्जित जमिनीच्या वाटप वादातून झालेल्या घटनेत भावाने भावाच्या पत्नी व सासू -सासर्यांवर तलवारीने हल्ला केल्याची घटना घडली असून या घटनेत तिघेजण गंभीर जखमी असून त्यांच्यावर नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे संशयित आरोपीस दिंडोरी पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत दिंडोरी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की शिवाजी नाथा शार्दुल व तानाजी नाथा शार्दुल रा. उमराळे खुर्द या दोन भावांमध्ये वडिलोपार्जित जमिनीच्या वाटपावरून वाद होता हा वाद दिंडोरी पोलीस ठाण्यात पोहचला होता दिंडोरी पोलिसांनी दोघा भावांना समज देत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला होता मात्र शनिवारी शिवाजी शार्दुल व त्यांच्या भावाची पत्नी वैशाली उर्फ कविता यांचेत वाद झाले वादाचे पर्यावसन हाणामारीत होत यात शिवाजी यांनी तानाजी ची पत्नी वैशाली वर तलवारीने हल्ला केल्याचे तानाजीने दिंडोरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे तानाजीच्या पत्नीस सोडविण्यास आलेले त्याचे सासू व सासरे माया व प्रकाश इंगोले रा. एकलहरे यांच्यावरही शिवाजी यांनी तलवारीने हल्ला केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे यात तिघेही गंभीर जखमी झाले तीनही जखमींना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे दिंडोरी पोलिसांनी फिर्यादीनुसार शिवाजी शार्दुल यांची पत्नी व मुलगा मुलगी यांचे वर गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राखुंडे करत आहे.
the-land-distribution-dispute-reached-a-critical-point-and-something-happened-next