महाराष्ट्र

प्रवाशांच्या सुविधांची लिंक अजूनही तुटलेलीच!

शहर वाहतुकीच्या सिटीलिंकला वर्ष पूर्ण, नाशिक दर्शन कागदावरच
नाशिक : प्रतिनिधी
नाशिककरांच्या दैनंदिन आयुष्याचा अविभाज्य भाग बनलेल्या सिटी लिंक बसला आज बरोबर एक वर्ष पूर्ण झाले. या एक वर्षात ही बस नाशिककरांच्या अंगवळणी पडली असली तरी अद्यापही बर्‍याचशा सुविधा नागरिकांना मिळत नसल्याची ओरड आहे.
राज्य परिवहन महामंडळाची शहर बस सेवा कोरोनाकाळात बंद झाल्यानंतर शहरात नाशिक महानगर पालिकेच्यावतीने सिटी लिंक कंपनी मार्फत शहर बससेवा 8 जुलै 2021 रोजी तात्कालिन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उदघाटन करत सुरू करण्यात आली. सिटी लिंक बससेवेला नाशिककरांनीही अभूतपूर्व प्रतिसाद दिला त्यामुळे. आल्पावधीत बसफेर्‍या वाढवण्यात आल्या. मध्यंतरी राज्यात राज्य परिवहन महामंडळाचा संप असताना ग्रामीण भागातील नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून जिल्ह्याच्या काही भागातही सिटी लिंक बससेवा सुरू करण्यात आली. त्यामुळे सिटी लिंकची शहर बससेवा आता फक्त शहरापुरती मर्यादित न राहता जिल्हयाच्या ग्रामीण भागातही पोहचली आहे.
सिटी लिंकबससेवेला नागरिकांची पसंती असली तरी बससेवा अर्थिक तोट्यात आहे. त्यामुळे सिटी लिंक ला अर्थिक तोट्यातून बाहेर काढण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्नही करण्यात येत आहे. त्यानुसार सिटी लिंकसुरूच्या झाल्यानंतर अवघ्या सहा महिन्यात सिटी लिंकच्या बस भाड्यात वाढ करण्यात आली होती. त्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती. असे असले तरी शहर बससेवेला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. गेल्या वर्षभरात 1 कोटी 63 लाख 46 हजार 765 प्रवाशांनी प्रवास केला आहे. तर वर्षभरात 96 लाख 80 हजार 159 किलोमिटरचा प्रवास केला.
बस भाड्याबाबत नाराजी
सिटी लिंक बसकडून आकारण्यात येणार्‍या भाड्यावर प्रवासांची नाराजी आहे. कारण राज्य परिवहन महामंडळाच्या बसला तिकीटदर कमी होता. मात्र सिटी लिंक बसच्यावतीने आकारण्यात येणारे भाडे हे रिक्षाच्या भाड्यासारखे असल्याने नागरिक नाराजी व्यक्त करतात.

सिटी लिंक आणि वाद
सिटी लिंक बस सुरू झाल्यापासून अनेक कारणाने चर्चेत आहे. त्यात सिटी लिंक बस आणि वाद हे जणू आता समीकरण बनले आहे. बसचालक हे व्यवस्थित बस चालवत नाहीत असा आरोप इतर वाहनधारकांकडून करण्यात येतो. तसेच अनेक वेळा प्रवासी आणि वाहक यांच्या सुट्या पैश्यावरून वाद होतात.

ऍपबाबतीत तक्रारी
सिटी लिंकबसच्या ऍप बाबतीत असलेल्या तक्रारीचे निवारण करत ऍप लवकरात लवकर प्रवाशांच्या सेवेत उपलब्ध करून द्यावे अशाी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

पास सुविधेचा लाभ
सिटी लिंकच्या वतीने सुरू करण्यात आलेली पास सुविधा ही विद्यार्थ्यासह नियमित प्रवास करणरार्‍या प्रवाशांनाही उपयोगी ठरत असल्याने पास सुविधेचा लाभ मोठ्या प्रमाणात नागरिक घेत आहेत. गेल्या वर्षभरात 26 लाख 83 हजार 482 प्रवाशांनी लाभ घेतला.

राखीव सिट बाबतीतले नियम पाळावेत
सिटी लिंकच्या प्रत्येक बसमध्ये सिटच्या वर ज्यांच्यासाठी राखीव आहे ते लिहलेले आहे. बस मधील डावीबाजू पूर्ण महिलांसाठी राखीव असताना या सिटवर पुरूष बसलेले असतात. मात्र इतर शहरात राखीव सिटवर ज्यांच्यासाठी राखीव आहेत तेच बसतील याची खबरदारी बस कंडक्टर घेत असतात.

नाशिक दर्शन बसची प्रतीक्षाच
सिटी लिंकच्या वतीने नाशिक दर्शन बस सुरू होणार अशाी घोषणा करण्यात आली होती. तसेच नियोजन पण सुरू होते. मात्र अद्याप नाशिक दर्शन बस सुरू होऊ शकली नाही.त्यामुळे नाशिक दर्शन बसला मुहुर्त कधी मिळणार असा प्रश्‍न नागरिक विचारत आहेत.

या आहेत नागरिकांच्या अपेक्षा
1.ज्या भागात बस फेर्‍या कमी आहेत, त्या वाढवण्यात याव्यात.
2.ज्येष्ठ नागरिकांना बस तिकीटात सवलत मिळावी.
3.नाशिक दर्शन बस सुरू करण्यात यावी.
4. तिकीट दर कमी असावेत.
5 ऍप बाबतीत तक्रारीचे निवारण करावे.

Ashvini Pande

Recent Posts

कसबेसुकेनेत बिबट्या जेरबंद

कसबे सुकेणे येथील तिडके वस्तीवर जेरबंद झाला बिबट्या कसबेसुकेणे: येथील दशरथ पोपट तिडके यांच्या शेत…

1 day ago

सातपूरला ज्योती स्ट्रक्चर कंपनीला आग

सातपूर: प्रतिनिधी सातपूर एमआयडीसीतील ज्योतीस्ट्रक्चर कंपनीला आज दुपारच्या सुमारास आग लागली . या  आगीचे कारण…

2 days ago

लासलगावी कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक ; कांद्याचे लिलाव पाडले बंद

लासलगावी कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक ; कांद्याचे लिलाव पाडले बंद लासलगाव:-समीर पठाण केंद्र सरकारने कांद्यावरील…

3 days ago

जीएम साहेब येता दारी तोच दिवाळी दसरा

मनमाड : प्रतिनिधी मराठीत एक म्हण आहे साधु संत येता दारी तोच दसरा दिवाळी ती…

3 days ago

ऑनर किलींग रोखण्यासाठी आता हेल्पलाईन तर गेस्ट हाऊस होणार सेफ होम !

ऑनर किलींग रोखण्यासाठी आता हेल्पलाईन तर गेस्ट हाऊस होणार सेफ होम ! निर्णयाचे अंनिस कडून…

3 days ago

पारा ५.७ अंशांवर स्थिर ,द्राक्षबागायतदार अस्थिर!

पारा ५.७ अंशावर स्थिर ,द्राक्षबागायतदार अस्थिर! निफाड :  प्रतिनिधी शहरासह तालुक्यात थंडीने मुक्काम. वाढविला आहे…

5 days ago