‘घर को सजाते है वही, धुम मचाते है वही’चा जयघोष

शहरात ईद-ए-मिलादुन्नबीची मुख्य मिरवणूक आज

जुने नाशिक : वार्ताहर
घर को सजाते है वही, धुम मचाते है वही, जिन पर हुआ उनका साया, आका का मिलाद आया, म्हणत काल (दि. 4) रात्री शहरातील मुस्लिम बांधवांनी ईद-ए-मिलादुन्नबीचा जल्लोष साजरा केला. रात्री पावसाने उघडीप दिल्याने मुस्लिम युवकांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले होते. रात्री उशिरापर्यंत देखावे पाहण्यासाठी महिला पुरुषांसह आबालवृद्धांची गर्दी उसळली होती.
आज (दि. 5) दुपारी अडीच वाजता चौक मंडई येथून ईद-ए-मिलादुन्नबीची मुख्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. खतीबे शहर हाफिज हिसामुद्दिन अशरफी व स्थानिक उलेमच्या नेतृत्वाखाली जुलूस काढण्यात येणार आहे. जुलूसच्या संपूर्ण मार्गावर विविध युवक मंडळातर्फे आकर्षक सजावट करून विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
याशिवाय संपूर्ण मुस्लिम बहुल भागांमध्ये प्रथमच मोठ्या प्रमाणावर सजावट करण्यात आली आहे. तसेच डीजे व स्पीकर लावून रात्री उशिरापर्यंत त्यावरून कव्वाली व नात शरीफचे प्रसारण सुरु होते.
या पार्श्वभूमीवर सर्वत्र चौख पोलीस बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले होते. दरम्यान हा सण धार्मिक पद्धतीने उत्साहात साजरा करावा. कोणालाही त्रास होणार नाही, याची काळजी घ्यावी मिरवणूक संपल्यानंतर संपूर्ण मिरवणूक मार्गावरील सजावट, झेंडे, पताका काढून दघेण्यात यावे, असे आवाहन सुन्नी मरकजी सिरत कमिटीतर्फे करण्यात आले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *