यंदा राख्यांना महागाईची वीण
नाशिक : प्रतिनिधी
बहीण-भावाच्या नात्याची वीण घट्ट करणारा रक्षाबंधन सण दहा दिवसांवर आला आहे. रक्षाबंधन सणासाठी लागणार्या राखीची खरेदी करताना सर्वसामान्यांना मात्र महागाईच्या झळा सोसाव्या लागणार आहेत. यानिमित्ताने बाजारपेठेत विविध प्रकारच्या आकर्षक राख्यांची अनेक दुकाने थाटली आहेत. महिलांकडून आपल्या भावासाठी आकर्षक अशा राख्यांची राखी खरेदी करण्यात येत आहे. यंदा राख्यांच्या दरात 20 ते 25 टक्क्यांनी वाढ झाल्याने राखीच्या खरेदीसाठी अधिक पैसे मोजावे लागत आहेत.
रक्षाबंधनासाठी ऑगिन्ड कॉकरोचेस, लेझर लाइट, कार्टून राखी, पारंपरिक गोंड्याची राखी, तसेच आकर्षक अशा डायमंड राख्यांना
मागणी आहे.
रक्षाबंधन सणाला विशेष महत्त्व आहे. बहीणभावाच्या नात्यातील प्रेम, जिव्हाळा, आदर यांची वीण घट्ट करत बहिणींकडून भावांना राखी बांधून रक्षण करण्याची ओवाळणी मागण्यात येते.
अर्थात, भावांकडूनही बहिणीच्या सुख-
दुःखात साथ देणार असल्याचे सांगत नात्यातील जिव्हाळा वृद्धिंगत केला जातो.
आकर्षक राख्यांना मागणी
डायमंड राखी, रंगीबेरंगी चुडी राखी, तसेच बच्चेकंपनीकडून कार्टून कॅरेक्टरच्या राख्यांना अधिक पसंती देण्यात येत आहे.
राख्यांच्या किमतीत वाढ
पारंपरिक राख्यांची किंमत 5 ते 10 रुपयांपासून दीडशे रुपयांपर्यंत आहे. डिझाइनच्या राख्यांची किंमत 20 रुपयांपासून 300 रुपयांपर्यंत आहे. यंदा राख्यांच्या दरात 20 ते 25 टक्क्यांंनी वाढले आहेत.