कावळ्याच्या खोडकरपणाची चर्चा रंगली चांदोरी गावात
कावळ्याच्या खोडकरपणाचा व्हिडिओ व्हायरल
लासलगाव:-समीर पठाण
कावळा हा चाणाक्ष व अत्यंत सावध असणारा पक्षी म्हणून ओळखला जातो तो सहसा माणसांजवळ येत नाही.परंतु नुकताच चांदोरीकरांनी एक वेगळाच अनुभव घेतला.एका ज्येष्ठ नागरिकाच्या खांद्यावर साधारण आर्ध तास कावळ्याने खोडकरपणा केला.या कावळ्याच्या खोडकरपणाचा व्हिडिओ खूप व्हायरल झाला आहे
चांदोरी गावात सकाळच्या वेळी चांदोरी गावचे पोलिस पाटील अनिल गडाख यांच्या दुकानासमोर माजी सरपंच भास्कर टर्ले,काशीनाथ टर्ले,गोरक्षनाथ डांगले,आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सागर गडाख व सुरेश शेटे हे सकाळी गप्पागोष्टी करत बसले होते या वेळी एक कावळा सुरेश शेटे यांच्या खांद्यावर येऊन बसला त्यांनी त्याला हुसकवण्याचा प्रयत्न केला परंतु खोडकर कावळा त्यांच्या खांद्यावरच उड्या मारू लागला.कावळ्याची लीला पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली.
या वेळी कावळ्याने सुरेश शेटे यांच्या खांद्यावरून डोक्यावर चढण्याचा प्रयत्न केला मात्र त्याला काही यश आले नाही.शेटे यांच्या कानाजवळ जाऊन कावळ्याने जोरजोरात कावकाव चा सुर आळवला.हा सर्व प्रकार पाहून त्याठिकाणी उपस्थितांमध्ये हास्याची लकेर उलटली.साधारण अर्धा तास कावळ्याने मनोरंजन केल्यानंतर त्या कावळ्याने आकाशात भरारी घेतली.
या घटनाक्रमाचे व्हिडिओ व्हायरल होताच त्याविषयीची चर्चा गावत रंगली आहे.
पाहा खोडकर कावळा
नाशिक: प्रतिनिधी ज्येष्ठ खगोल तज्ज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचे आज निधन झाले. ते 86 वर्षांचे…
भुजबळ फार्मवर कार्यकर्त्यांचा जल्लोष छगन भुजबळांचे दमदार पुनरागमन सिडको: दिलीपराज सोनार ज्येष्ठ नेते छगन भुजबळ…
छगन भुजबळ मंत्रिमंडळात उद्या मुंबईत शपथविधी नाशिक : प्रतिनिधी मंत्रिपद न मिळाल्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून…
12 राशींचे राशीभविष्य मेष रास मेष राशीच्या लोकांनो आज प्रवास करताना कोणताही धोका पत्करू नका,…
रस्त्याने जाणेही ठरतेय धोकादायक नाशिक : प्रतिनिधी शहरातील धोकादायक झाडांचा प्रश्न ऐरणीवर आला असून, महापालिकेचा…
नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयामार्फत उच्च माध्यमिक प्रथम वर्ष…