इंदिरानगर येथील युवकाच्या खुनाचे गूढ उकलले, पत्नीने प्रियकराच्या मदतीने काढला काटा

इंदिरानगर येथील युवकाच्या खुनाचे गूढ उकलले, पत्नीने प्रियकराच्या मदतीने काढला काटा
नाशिक:प्रतिनिधी
इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खत प्रकल्पाजवळ युवकाच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना घडली होती, या खुनाचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले आहे, पत्नीने प्रियकराच्या मदतीने खून केल्याचे उघड झाले आहे, योगेश बत्तासे या युवकाचा खून झाल्याची घटना घडली होती, या युवकाचा मावसभाऊ असलेल्या कृष्णा नामक युवकबरोबर मयत योगेश च्या पत्नीचे अनैतिक संबंध होते, ही बाब योगेश याला समजल्याने यावरून वाद झाले होते, योगेशला कृष्णा याने खत प्रकल्प जवळ बोलावून घेतल्यानंतर त्यांच्यात वाद झाले, त्यामुळे कृष्णा याने योगेशच्या डोक्यात दगड घालून खून केल्याचे तपासात उघड झाले आहे, याप्रकरणी पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.
कोमल योगेश बत्ताशे (रा. पिंपरखेड, ता. नांदगाव) कृष्णा जयराम गाेराणे (रा. सिडकाे) अशी अटक केलेल्या संशयित प्रेमीयुगुलाचे नाव आहे. योगेश बत्ताशे याची पत्नी कोमल व याेगेशचा मावसभाऊ कृष्णा यांचे काही महिन्यांपासून प्रेमसंबंध हाेते. दाेघेही सिडकोत एकाच घरात भाडेतत्वावार राहत होते. ही बाब योगेशला समजली. त्यातून त्यांच्यात वादही झाला होता. त्यातून हे हत्याकांड घडलं

Bhagwat Udavant

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

4 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

4 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

5 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

5 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

5 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

5 hours ago