तलवारीचा धाक दाखवून दहशत माजवणाऱ्यास नाशिकरोड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
नाशिकरोड : प्रतिनिधी
तलवारीचा धाक दाखवत दहशत माजविणा-या एकास नाशिकरोड पोलीसांनी बेड्या ठोकल्या. एकलहरा येथील पहाडीबाबा झोपडपट्टीत शहर गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या पथकाने ही कारवाई केली. संशयिताच्या ताब्यातील लोखंडी तलवार हस्तगत करण्यात आली आहे.गौरव भिकन गडवे (२२ रा. पहाडीबाबा झोपडपट्टी,पंचशिलनगर,एकलहरा ) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. पहाडीबाबा झोपडट्टी भागात एक जण तलवारीचा धाक दाखवून परिसरात दहशत माजवित असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार
पथकाने मुसक्या आवळल्या. संशयिताच्या ताब्यात लोखंडी तलावर हस्तगत करण्यात आली आहे. याबाबत जमादार बाळू शेळके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खा. वाजे : शिवसेना कार्यालयात मनसे पदाधिकार्यांची उपस्थिती नाशिक : प्रतिनिधी सरकारला हिंदीसक्तीचा निर्णय मागे…
धरण समूहात 47 टक्के; गंगापूर धरणात 56 टक्के पाणीसाठा नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यात गेला महिनाभर…
चेन खेचल्याने वीस दिवसांत 98 गाड्यांना विलंब नाशिकरोड : प्रतिनिधी रेल्वेची विनाकारण चेन ओढण्यामुळे 1…
सध्या सुरू असलेल्या पहिलीपासूनच्या त्रिभाषा सूत्रासंदर्भात आपण सर्व मराठी बांधवांनी जाणून घ्यायला हवे आपल्या मराठी…
पारोळा : एका अनोळखी महिलेच्या डोक्यात दगड टाकून हत्या करण्यात आली होती. यानंतर महिलेचा मृतदेह…
अभोणा ग्रामपालिकेचे दुर्लक्ष, कचरा डेपोसाठी जागा नसल्याचा जावईशोध अभोणा : प्रतिनिधी देशभर स्वच्छ भारत मिशनचा…