शेवटच्या दिवशी उमेदवारांची धावपळ; प्रचाररॅली, कार्नर सभा, भेटीगाठींवर भर
येवला : प्रतिनिधी
येवला नगरपालिका निवडणुकीसाठी मंगळवारी (दि. 2 डिसेंबर) मतदान होणार आहे. दुसर्या दिवशी म्हणजे बुधवारी (दि. 3) निवडणुकीचा निकाल घोषित होणार आहे. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांसह अपक्ष उमेदवारांच्या प्रचाराने शहरात प्रचंड गर्दी दिसली.
प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने निवडणुकीसाठी उभे ठाकलेल्या उमेदवारांची मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी चांगलीच धावपळ दिसली. उमेदवारांच्या प्रचार गर्दीने शहराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट, भाजप आणि रिपाइं (आठवले गट) महायुती, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट आणि मित्रपक्ष, वंचित, शिवसेना उबाठा, काँग्रेस आदी राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी तसेच अपक्ष लढणार्या उमेदवारांनी आपली प्रचारयंत्रणा अधिक प्रमाणात राबवून मतदारापर्यंत पोहोचून आपला प्रचार केला आहे.
सोमवारी दिवसभर शहरात विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते प्रचारात व्यस्त होते. शेवटच्या दिवशी रॅलीच्या माध्यमातून मतदारांच्या भेटीगाठीवर उमेदवारांनी जोर दिला. येवला शहराच्या सर्वांगीण विकासासाठी, शहर स्वच्छ सुंदर बनविण्यासाठी, शहराच्या प्रगतीसाठी मतदान आम्हालाच करा, नगरपालिकेची सत्ता आमच्या पक्षाच्या ताब्यात द्या, असे आवाहन राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी मतदारांना केले आहे. दरम्यान उमेदवारांची प्रचार रॅली, कार्नर सभा, तसेच भेटीगाठी, प्रभाग सभा यामुळे शहरातील निवडणुकीचे वातावरण ढवळून निघाले होते. या निवडणुकीच्या निमित्ताने शहरात उमेदवारांची पळापळ अधिक प्रमाणात दिसली. प्रचारासाठी रिक्षा, दुचाकी, तसेच इतर वाहनांचा वापर करण्यात आला. शहरात उमेदवारांकडून आश्वासनाचे पत्रक वाटण्यात आले. जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. विकासाची कामे युद्धपातळीवर करू, असे जनतेला आश्वासित करण्यात आले. शहरात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, भाजप, रिपाइं (आठवले गट) महायुतीच्या वतीने राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांची ऑनलाइन सभा घेण्यात आली. माजी खासदार समीर भुजबळ, आमदार पंकज भुजबळ, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते दिलीप खैरे, तसेच इतर नेत्यांनी महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचारयंत्रणा राबवली, तर शिवसेना शिंदे गट- मित्रपक्षांच्या वतीने उपमुख्यमंत्री तथा शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांची शहरात जाहीर सभा झाली. शिवसेना मित्रपक्षांच्या उमेदवारांसाठी शिवसेना आमदार किशोर दराडे, माजी आमदार नरेंद्र दराडे, युवानेते कुणाल दराडे, शिवसेना नेते किशोर सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे ज्येष्ठ नेते अॅड. माणिकराव शिंदे, माजी नगराध्यक्ष रामदास दराडे आदींनी प्रचार केला आहे. यानिमित्ताने शहरात नगरपालिका निवडणुकीचा जल्लोष पाहावयास मिळाला.
फरार भूषण लोंढेच्या मुसक्या आवळल्या त्याच्यासह सहकार्याला नेपाळ सीमेजवळून अटक सिडको : विशेष प्रतिनिधी सातपूर…
लासलगाव : वार्ताहर निफाड तालुक्यातील थेटाळे शिवारात मंगळवारी दुपारी 2.30 च्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत…
हवेची शुद्धता राखण्यासाठी 33 टक्के वृक्ष, झाडी आणि बगीचा असणे गरजेचे आहे, पण झाडांची संख्या…
मतदान यंत्रात किरकोळ तांत्रिक बिघाड; धक्काबुक्की, शाब्दिक बाचाबाची आणि तणावाचे वातावरण सिन्नर : प्रतिनिधी सिन्नरला…
देवगाव, रुई, गोंदेगाव, मरळगोई परिसरात बिबट्यांचा वाढता वावर लासलगाव : वार्ताहर द्राक्ष उत्पादनामुळे जागतिक ओळख…
शेतकरी मेटाकुटीस; गोणीमागे 200 ते 250 रुपये अधिक मोजावे लागणार लासलगाव : वार्ताहर गेल्या काही…