नाशिक ः प्रतिनिधी
साहित्य हे वैश्विक जाणिवेचे असावे. तुम्ही आणि साहित्य वेगळे नाही, या भावनेतून लिखाण झाल्यास ते एकजिनसी होईल अन् त्याच साहित्यातून खर्या अर्थाने वंचितांचा हुंकार झाला पाहिजे, अशी अपेक्षा ज्येष्ठ कवी, साहित्यिक, लेखक प्रा. वा. ना. आंधळे यांनी व्यक्त केली.
वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य साहित्य आघाडीतर्फे समाजाचे पहिले एकदिवसीय राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन रविवारी (दि. 25) रावसाहेब थोरात सभागृहात पार पडले. त्यावेळी अध्यक्षस्थानाहून आंधळे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर स्वागताध्यक्ष प्रशांत आंधळे, संत साहित्याचे अभ्यासक डॉ. तुळशीराम महाराज गुट्टे, वंजारी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश खाडे, डॉ. लक्षराज सानप, मुंबई येथील डॉ. विजय दहिफळे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड, भाजप शहराध्यक्ष गिरीश पालवे, कांचन खाडे, गणेश खाडे, ज्येष्ठ उद्योजक बुधाजी पानसरे, दामोदर मानकर, माधुरी पालवे, के. के. सानप, मारुती उगले, दिव्यांग आघाडीचे बाळासाहेब घुगे, लेखिका लता गुठे, लक्ष्मण जायभावे, रणजित आंधळे, तानाजी जायभावे आदी मान्यवर उपस्थित होते.
आंधळे म्हणाले की, साहित्यातून सामाजिक विषमता मांडता आली पाहिजे. ती वाचन, अनुभवातून येते. मला आजोबांकडून कवितांचा वारसा मिळाला. साहित्य, समाज अन् नात्यापलीकडे साहित्य असते. सामूहिक पद्धतीने लढा दिल्यास त्याला यश मिळते. त्यामुळे येथून पुढे देखील अधिक ताकद लावून साहित्य संमेलन भरवून, समाजाला चांगली दिशा देण्याचे आवाहन त्यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासमवेत आपला समाज व्यापारी, शेतकरी आणि आज विविध क्षेत्रांत आघाडीवर असल्याचे आंधळे म्हणाले.
हुंडा पद्धत, वाढते घटस्फोट, बेरोजगारी हे समाजातील मुख्य प्रश्न असून, ते सोडवण्यासाठी संघटित होण्याची गरज असल्याचे आवाहन डॉ. लक्षराज सानप यांनी केले. विचारांबरोबरच समाजाचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी महासंघ काम करत असल्याचे ते म्हणाले. समाज सर्व क्षेत्रात आघाडीवर असून, ही वाटचाल अशीच सुरू ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे भटक्या विमुक्तच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष कांचन खाडे आणि भाजपच्या वैद्यकीय आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष डॉ. मंजुषा दराडे यांनी यावेळी
सांगितले.
साहित्यात समाज घडविण्याची ताकद आहे. त्यामुळे समाजाभिमुख उत्तमोत्तम साहित्य निर्माण व्हायला हवे, अशी अपेक्षा गणेश खाडे यांनी व्यक्त केली. संमेलनास राज्यातील विविध भागासह गुजरात, राजस्थान तेलंगणासह राज्यभरातून समाजबांधव सहभागी झाले होते.
घिबली अॅपची कमाल मशालच्या जागी कमळ! मनमाड : आमिन शेख सध्याचा जमाना डिजिटलचा आहे. दररोज…
नियोजित वधुचे अफेअर उघड विवाहापूर्वीच आयकर अधिकारी असलेल्या वराने संपविले जीवन नाशिक : प्रतिनिधी नियोजित…
लासलगाव येथे पटेल सॉ मिलला आग श्री सिद्ध वीर हनुमान मित्र मंडळाच्या अग्निशमन टँकर मुळे…
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती अमाप उत्साहाने नाशिकरोड ः वार्ताहर…
शिधापत्रिकांची होणार तपासणी सिन्नर प्रतिनिधी तालुक्यात तहसिल कार्यालयातील पुरवठा विभागामार्फत बोगस व अपात्र शिधापत्रिका शोध…
80 फेर्या सुरू; कमी दाबाच्या पाण्यामुळे नागरिक त्रस्त नाशिक : प्रतिनिधी वाढलेल्या तापमानाबरोबर शहरातील विविध…