नाशिक

पालिकेची सदस्य संख्य पुन्हा 122 होणार ?

 

तर प्रभाग तीनचाच राहण्याची शक्यता

नाशिक : प्रतिनिधी

राज्य शासनाने नव्याने प्रभाग रचना करण्याच्या सूचना नाशिकसह राज्यातील पालिकांना दिल्या आहे. त्यानुसार याचाच भाग म्हणून की काय गुरुवाई (दि.24) निवडणूक आयोगाबरोबर झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे बैठकीत महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी भाग घेतला होता. यावेळी आयोगाने मतदान यादीचा घोळ होणार नाही, याची दक्षता घेण्याचे सूचना केले. दरम्यान महाविकास आघाडी सरकार असताना नाशिकमधील पालिकेतील सदस्यसंख्या 122 वरुन 133 करण्यात आली होती. मात्र आता नव्याने होणाऱ्या प्रभाग रचनेत नाशिक पालिकेतील सदस्य संख्या पुन्हा 122 होण्याची शक्यता असल्याची जोरदार चर्चा पालिका वर्तुळात आहे. परंतु प्रभागातील सदस्य संख्या ही तीन राहणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे नाशिकची आगामी महापालिका 3 सदस्यी नुसारच होणार असल्याची जोरदार चर्चा आहे.

 

 

याआधी प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यावर शहरातून 3 हजार 800 हरकती प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे आता अशी परिस्थिती येऊ देऊ नये अशा सूचना पालिकेला केलेल्या समजते आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना नाशिक महापालिका निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार महापालिका प्रशासनाने एकूण 12 लाख 372 मतदारांची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली होती. त्यात 6 लाख 29 हजार 682 पुरुष तर 5 लाख 70 हजार 636 महिला मतदार संख्या होती. 2011 च्या जनगणनेनुसार नाशिक शहरातील लोकसंख्या सुमारे 14 लाख 85 हजार आहे तर यापूर्वी महापालिकेने महाविकास आघाडी सरकारच्या काळात 133 नगरसेवक याप्रमाणे मतदार यादी तयार केली होती, मात्र आता वाढीव केलेल्या अकरा जागा कमी होणार असल्याचे बोलले जात असून पुन्हा सदस्य संख्या ही 122 होण्याची शक्यता आहे. असे झाल्यास प्रभागातील मतदार संख्या पाच ते सहा हजारांनी वाढणार आहे. तसेच यापूर्वी असलेले 44 प्रभागांची संख्या कमी होण्याची शक्यता आहे. शासनाने यापूर्वी दिलेल्या निर्देशात फक्त वाढीव नगरसेवक संख्या कमी करण्याचे आदेश दिले होते, मात्र प्रभाग रचना तीन की चार याबाबत कोणते ही नवीन आदेश दिले नसल्यामुळे 30 सप्टेंबर 2022 च्या आदेशानुसार 3 सदस्य प्रमाणे नवीन रचना होणार असल्याचे समजते. मागील प्रभागा रचनेच्या तुलनेत यंदा प्रत्येक प्रभागात लोकसंख्या तसेच मतदार संख्या देखील वाढणार आहे. तर नगरसेवक संख्या 133 वरून कमी होऊन 122 राहणार असल्याचे समजते. दरम्यान आज दुपारी त्याचप्रमाणे मागच्या वेळेला झालेल्या त्रुटी दूर करून अद्यावत मतदार यादी तयार करण्याचे आदेश देखील दिले आहे. यासाठी महापालिका प्रशासन तसेच महसूल विभागाचे अधिकारी प्रयत्न करणार आहे.

 

 

Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

9 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

9 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

9 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

9 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

9 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

9 hours ago