इच्छुक किती, त्यापेक्षा जिंकणार्‍यास पक्ष संधी देणार

आमदार दराडे : आगामी निवडणुकीसाठी येवल्यात शिवसेनेची बैठक

येवला : प्रतिनिधी
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाच्या आदेशाप्रमाणे निवडणुका लढवल्या जातील. इच्छुक किती आहे, यापेक्षा जिंकणार्‍या उमेदवाराला पक्ष संधी देऊ शकतो. त्यामुळे सर्वांनी आपापल्या परीने ताकदीने कामाला लागावे, असे प्रतिपादन आमदार किशोर दराडे यांनी केले.
जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येवला शहरात शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली. आमदार दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीला शिवसेनेचे ज्येेष्ठ नेते किशोर सोनवणे, शिवसेना तालुकाप्रमुख पांडुरंग शेळके, माजी नगरसेवक संजय कासार, उपजिल्हाप्रमुख अमोल सोनवणे आदी उपस्थित होते. ही बैठक दोन सत्रांमध्ये झाली. प्रथम शहराची बैठक झाली. यामध्ये प्रत्येक वॉर्डरचनेचा पदाधिकार्‍यांकडून आढावा घेऊन सध्या पक्षाची काय परिस्थिती आहे यावर विचारमंथन झाले. शहरात पालिकेची निवडणूक जिंकण्याच्या दृष्टीने सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे शहर शिवसेनेतर्फे सांगण्यात आले. दुसर्‍या सत्रात तालुक्यातील ग्रामीण भागाची बैठक झाली. यात जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी इच्छुक उमेदवारांकडून गण व गटाचा आढावा घेण्यात आला. गावातील प्रमुख लोकांसह मतदारांच्या भेटीगाठी इच्छुकांच्या माध्यमातून सुरू असल्याचे इच्छुकांनी सांगितले. बैठकीत निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सर्वांनी कामाला लागावे, असे आवाहन आमदार दराडे यांनी केले. बैठकीत अनेक इच्छुक असल्याने प्रत्येकाला आपापल्या भागात पक्षाचे काम ताकदीने वाढवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बैठकीला माजी नगरसेवक संजय कासार, दयानंद जावळे, माँटी मथुरे, युवा सेनेचे तालुकाप्रमुख यश जगताप, शेतकरी संघटनेचे श्रावण देवरे पाटील, शरद कुदळ,अंकुश निकम, सरपंच रामकृष्ण खोकले, गणेश कोटमे, रावसाहेब पारखे, संतोष रोटे डॉ. महेश जोशी, उत्तमराव घुले, जालिंदर खैरनार, रवींद्र दाणेे, नवनाथ पोटे, संतोष वल्टे, अण्णा ढमाले, ऋषिकेश दौंडे, नितीन पिंपळे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *