बांधकाम विभागाकडून खड्डे बुजविण्यास प्रारंभ
सिन्नर ः प्रतिनिधी
पंढरपूरच्या वारीसाठी सिन्नर तालुक्यातून जाणार्या संत निवृत्तिनाथ महाराज पालखी मार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. सिन्नर तालुक्यात पालखीच्या आगमनापूर्वी संपूर्ण पालखी मार्ग दुरुस्त करून खड्डेमुक्त करण्याचे उद्दिष्ट ठेवल्याने पालखी मार्गाची वाट सुकर होणार आहे.
पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून मंगळवारी (दि.10) संत निवृत्तिनाथ महाराज पालखी आषाढी वारीसाठी निघणार आहे. सिन्नर तालुक्यात शनिवारी (दि. 14) पालखीचे आगमन होणार असून, पास्ते, लोणारवाडी, सिन्नर, कुंदेवाडी, मुसळगाव, दातली, खंबाळे, भोकणी, सुरेगाव, मर्हळ, निर्हाळेमार्गे घोटेवाडी येथील अश्विनाथ गडावरून अहिल्यानगर जिल्ह्यातील पारेगाव येथे मुक्कामी जाणार आहे.
दरम्यान, पालखी मार्गावर पास्ते ते लोणारवाडी आणि खंबाळे ते सुरेगाव, सुरेगाव ते पुढे पारेगावपर्यंत हा रस्ता खड्डेमय झाल्याने वारकर्यांना खड्ड्यांतून प्रवास करावा लागणार होता. यासंदर्भात ‘दै. गांवकरी’ने वृत्त प्रसिद्ध करून वारकर्यांची व्यथा मांडली होती. त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाने या वृत्ताची दखल घेऊन विशेष दुरुस्ती कार्यक्रमांतर्गत खड्डे बुजविण्याचे काम हाती घेतले आहे. जुन्या एजन्सीमार्फत हे काम सुरू करण्यात आले असून, पास्ते ते कुंदेवाडीपर्यंत काम पूर्ण करण्यात आले आहे.
आणखी यंत्रसामग्री वाढवून कुंदेवाडी ते खंबाळे व सुरेगाव ते पारेगाव हद्दीपर्यंतचे काम पूर्ण करण्यात येणार आहे.
सिन्नर तालुक्यात संत निवृत्तिनाथ महाराज पालखीचे आगमन होण्यापूर्वीच (दि.12 पर्यंत) पालखी मार्गावरील सर्व खड्डे बुजविण्यात येणार आहेत. याशिवाय साइडपट्ट्या दुरुस्ती, अडथळा ठरणारे काटेही काढण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे.
फलकांची केली दुरुस्ती
गेल्या वर्षी विशेष बाब म्हणून पालखी मार्गावर दिशादर्शक फलक लावण्यात आले होते. याशिवाय जागोजागी वारीच्या अभंगांचेही फलक लावण्यात आले होते. मात्र, काही ठिकाणी हे फलक जमीनदोस्त झाले होते, तर काही ठिकाणी पडझड झाली होती. हे सर्व फलक बांधकाम विभागाकडून पूर्ववत करण्यात आले आहे.
– अविनाश देवरे, उपअभियंता, सा. बां. विभाग
अंबडच्या फडोळ मळा परिसरात सिनेस्टाईल हाणामारी; दोन ते तीन जण जखमी पाहा व्हिडीओ सिडको।…
सिन्नर येथे चार लाख बेचाळीस हजार नऊशे स्क्वेअर फुटात साकारले अजित दादा पवार यांचे फार्म…
पथकाला पाहताच लाचखोर हवालदाराची धूम नाशिक : प्रतिनिधी घोटी पोलिस ठाण्यातील हवालदार राजाराम रुंजा डगळे…
मोखाडा पोलिसांनी पाठलाग करुन पकडली अफूनी भरलेली क्रेटा कार 15 लाखांचा मुद्देमाल जप्त मोखाडा :…
नाशिक: प्रतिनिधी मी ऑनलाइन रमी खेळत नव्हतो, मला खेळता पण येत नाही. मी वेडे वाकडे…
जामीनावर सुटला आणि विनयभंग केलेल्या मुलींच्या दारातच फटाके वाजवून नाच नाच नाचला शहापूर: साजिद शेख…