लक्ष्यवेध : प्रभाग-29
स्थानिक नेतृत्वाची मजबूत पकड, समीकरणे मात्र बदलली
मनपा निवडणुकीची चाहूल लागल्याने नाशिकच्या राजकारणात पुन्हा एकदा हालचाली वेग घेत आहेत. प्रभाग क्रमांक 29 हा नाशिक पूर्वमधील राजकीयदृष्टीने नेहमीच चर्चेत राहिलेला प्रभाग. गेल्या दोन दशकांत या प्रभागात झालेल्या विकासकामांमुळे भाजप व शिवसेना या दोन्ही पक्षांच्या स्थानिक नेतृत्वाने आपली मजबूत पकड निर्माण केली होती. मात्र, अलीकडील घडामोडींनी या समीकरणांमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणला आहे. शिवसेना (उबाठा) पक्षाच्या माजी नगरसेविका रत्नमाला राणे यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केल्याने प्रभागातील चारही माजी नगरसेवक आता भाजपचे झाले आहेत. परिणामी, या प्रभागात भाजपला एकसंघ संघटनात्मक बळ लाभले असून, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्याचा थेट राजकीय फायदा होण्याची चिन्हे आहेत.
शहराच्या वाढत्या गरजांना प्रतिसाद देत नगरसेवकांच्या कार्यकाळात तोरणानगर शाळेची नवी इमारत, पेलिकन पार्कमधील पाण्याची टाकी, बुद्धविहार पुलाचे विस्तारीकरण, स्टेट बँक चौक येथील अग्निशमन केंद्र, तसेच विविध परिसरातील रस्ते व ड्रेनेज विकासकामे अशी अनेक कामे पूर्णत्वास गेली. मोरवाडीतील तब्बल 20 वर्षे न्यायालयीन वादात अडकलेल्या 17 एकर पेलिकन पार्कचा तिढा सोडवून तेथे सिंगापूरच्या धर्तीवर सेंट्रल पार्कची उभारणी हा या प्रभागाच्या विकासातील मैलाचा दगड ठरला. मात्र, उद्यानाचे औपचारिक उद्घाटन न झाल्याने ते अद्याप बंद अवस्थेत असून, नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे.
प्रभागात सध्या भाजपचे तीन व शिवसेनेचे एक अशी माजी नगरसेवकांची संख्या होती. शिवसेना उबाठा पक्षाच्या रत्नमाला राणे यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केल्याने नीलेश ठाकरे, छाया देवांग, मुकेश शहाणे असे चारही माजी नगरसेवक भाजपचे आहेत.
प्रभागात नगरसेवकांच्या कार्यकाळात तोरणानगर शाळा इमारत बांधकाम. पेलिकन पार्क येथे पाण्याची टाकी बांधली. बुद्धविहार पुलाचे विस्तारीकरण, तोरणानगर ते शिवपुरी चौक मुख्य ड्रेनेज लाइन, स्टेट बँक चौक मुख्य अग्निशमनकेंद्राची इमारत बांधकाम. संपूर्ण उत्तमनगर परिसरात चार इंची पाण्याची लाइन टाकून पाणीप्रश्न सोडवला. राजरत्ननगर येथे आरोग्य केंद्र उभारणी. उत्तमनगर, राजरत्ननगर व साईबाबा परिसरातील सर्व अंतर्गत रस्ते काँक्रिटीकरण. पंडितनगर नाल्याचे काँक्रिटीकरण करून त्यावर जाळी बसवण्यात आली. व्ही. एन. नाईक कॉलनी परिसरातील अंतर्गत रस्ते, ड्रेनेज लाइन टाकण्यात आली. विजयनगर ते महालक्ष्मी मंगल कार्यालयापर्यंत नाल्यावर जाळी टाकून बंदिस्त करण्यात आला. उत्तमनगर, राजरत्ननगर परिसरातील सर्व धोकेदायक विद्युत तारा भूमिगत करण्यात आल्या. बुद्धविहार ते शुभम पार्क ते शिवपुरी चौकपावेतो रस्ता डांबरीकरण करून दुतर्फा पेव्हर ब्लॉक
बसवण्यात आले.
मोरवाडी येथील 17 एकर जागेत असलेल्या व न्यायालयीन वादात अडकलेल्या पेलिकन पार्कचा तिढा तब्बल 20 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सुटून या ठिकाणी सिंगापूरच्या धर्तीवर सेंट्रल पार्कची उभारणी करण्यात आली. घाईघाईत उद्यानाच्या नामफलकाचे उद्घाटन झाले, मात्र उद्यानाचे उद्घाटन न झाल्याने उद्यान बंद अवस्थेतच असल्याने नवीन नाशिककरांमध्ये नाराजीचा सूर
उमटत आहे.
प्रभागात चारही माजी नगरसेवक भाजपचे आहेत. माजी नगरसेविका रत्नमाला राणे यांच्या जागी त्यांचे पुत्र भूषण राणे यंदा उमेदवारीच्या रिंगणात आहेत. भाजप महिला शहराध्यक्ष सोनाली ठाकरेदेखील याच प्रभागात इच्छुक आहेत. अपूर्व हिरे यांच्या पत्नी योगिता हिरेदेखील या ठिकाणाहून भाजपतर्फे इच्छुक आहेत. भाजप पक्ष हिरेंना उमेदवारी देऊन कुठल्या माजी नगरसेविकेचे तिकीट कट करेल किंवा त्यांचेच तिकीट कट होईल हे तर येणारा काळच सांगेल. अवघ्या काही मतांच्या फरकाने पराभव झालेले अमोल महाले हे यंदा प्रभाग 29 मधून न लढता प्रभाग 24 मधून उमेदवारी करणार आहेत.
विद्यमान नगरसेवक

मुकेश शहाणे

रत्नमाला राणे

छाया देवांग

नीलेश ठाकरे
सन 2011 नुसार लोकसंख्या
लोकसंख्या : 53021 53021
अ. जाती : 4797
अ. जमाती : 1738
प्रभागाची व्याप्ती
विजय नगर, स्वामी विवेकानंद नगर, जय प्लाझा, अंबड पोलीस ठाणे, साईबाबा नगर, राजरत्न नगर, पवन नगर, रामेश्वर नगर, उत्तम नगर, अतुल डेअरी ,लोकमान्य नगर ,गणेश चौक, छत्रपती शिवाजी महाराज सेंट्रल पार्क, सोनवणे चाळ, तानाजी चौक
प्रभागाची विकासकामे
तोरणा नगर शाळा इमारत बांधकाम
पेलिकन पार्क येथे पाण्याची टाकी
बुद्ध विहार पुलाचे विस्तारीकरण ,तोरणा नगर ते शिवपुरी चौक मुख्य ड्रेनेज लाईन
स्टेट बँक चौक मुख्य अग्निशामक केंद्राची इमारत बांधकाम
उत्तम नगर परिसरात चार इंची पाण्याची लाईन
राजरत्न नगर येथे आरोग्य केंद्र उभारणी
उत्तम नगर राजरत्न नगर व साईबाबा परिसरातील रस्ते काँक्रिटीकरण
प्रभागातील समस्या
पेलिकन पार्क सेंट्रल उद्यान
वाहतुकीचा प्रश्न
ठिकठिकाणी कचरा, घाणीचे साम्राज्य
अनियमित घंटागाडी
अंतर्गत रस्त्यांची दैनावस्था
नागरिक म्हणतात…
विजयनगर ते दत्त चौक भाजी मार्केट दरम्यान असलेले दुभाजक हे तत्कालीन नगरसेविका कै. लताताई बाविस्कर यांच्या कार्यकाळात उभारलेले आहेत. सध्या हे दुभाजक मोडकळीस आलेले असताना सुद्धा एकाही लोकप्रतिनिधीने त्याकडे ढुंकूनही पाहिलं नाही.मनोज खैरनार
खासदार निधीतून स्वामी विवेकानंद चौक ते सत्यम मंगल कार्यालया पर्यंतचा काँक्रिटीकरणाचा रस्ता अगदी निकृष्ट बनविण्यात आला आहे. रस्ता बनताच पंधरा दिवसांच्या आत खराब झाला. निदान यापुढे अधिकार्यांनी अशा कामांची चौकशी करून ठेकेदाराला काळ्या यादीत टाका.
बाळासाहेब गवळी
केवळ वरवरची कामे होता कामा नये… कायमस्वरूपी उपाय योजना केल्यात तरच खर्या अर्थाने प्रभागाचा विकास होईल . प्रभागामध्ये होणारी कामे ही केवळ तात्पुरत्या स्वरूपात डागडुजी केली जात असल्याने नागरिकांच्या वारंवार तक्रारी येतात. या भागातील ड्रेनेज लाईन, आरोग्याच्या दृष्टीने नियमित स्वच्छता स्वच्छता तसेच पावसाळ्यामध्ये पाण्याचे मोठ्या प्रमाणावर गल्लीतून लोंढे वाटतात व पाणी थेट लोकांच्या घरात घुसत आहे यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे आहे.
कविता कडवे
आरोग्याच्या दृष्टीने उपाययोजना केल्या पाहिजे.या ठिकाणी मोठा पावसाळी नाला असून त्याची नियमित साफसफाई, स्वच्छता होत नसल्याने या परिसरात रोगराई पसरत असेल. लोकप्रतिनिधी व मनपाने याची दखल घेऊन या नाल्याची उंची वाढवून यावर स्लॅब टाकण्यात यावा. तसेच चौक परिसरात नियमित फवारणी करून स्वच्छ परिसर राहिला तरच खर्या अर्थाने स्वच्छ नाशिक सुंदर नाशिक राहील
हर्षल भदाणे-पाटील
इच्छुक उमेदवार
छाया देवांग, नीलेश ठाकरे,मुकेश शहाणे, रत्नमाला राणे,भूषण राणे,सोनाली ठाकरे, सुमन सोनवणे,शीतल भामरे, भूषण देवरे, संगीता बरके, शिवाजी बरके, मोनिका वराडे, अंकुश वराडे, मंदा साळवे , मकरंद सोमवंशी, बाळासाहेब गीते, वर्षा वेताळ, अर्जुन वेताळ, शीला भागवत, तुळशीराम भागवत, मंदाकिनी जाधव, श्रद्धा पाटील, सुयश पाटील,देवेंद्र पाटील, परमानंद पाटील, योगिता हिरे, सुनील जगताप, प्रभावती जडे,राजेंद्र जडे, जितेंद्र जाधव, सोनल मंडलेचा, मीरा साबळे, ज्योती शिंदे ,मंजुषा दराडे, प्रियांका कडभाने, सागर कडभाने, लक्ष्मण जायभावे, अर्चना दिंडोरकर ,रोहन कानकाटे, सतीश खैरनार,राष्ट्रवादी काँग्रेस (अजीत पवार गट) सुनीता महाजन ,कुणाल धात्रक ,पुंजाराम गामने, कृष्णा काळे,शरद काळे,नितीन माळी,देवा वाघमारे,अरविंद शेळके, मयूर परदेशी, देवचंद केदारे, विनोद भडांगे, सागर नागरे, दीपक मोकळं,संतोष लोढा,सुप्रिया संतोष ठाकुर, संतोष शंकर ठाकूर



