देवयानी सोनार
माझे वडील जगन्नाथ म्हात्रे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात होते. नाटकात काम करीत होते. आचार्य अत्रेंना भाषण करण्यासाठी बोलवीत असे. कमिटीचे प्रमुख होते. नाटकात काम करायचे. क्रिकेट, आट्यापाट्या, कॅरम आवडीचे खेळ होते. दिसण्या-वागण्यात करारीपणा होता. त्यामुळे त्यांचा आमच्यावर प्रभाव राहिला आहे. मला त्यांच्यासारखे होता आले नाही.लेखन केले, परंतु त्यांच्यासारखे भाषण, नायकासारखे वागता आले नाही. स्वाभिमानी असल्याने आयुष्यभर लाच खाल्ली नाही, उगाचच कोणाला बढती दिली नाही.
रागीट, हट्टी आणि आपल्या मताबद्दल आग्रही होते. अन्यास सहन न करण्याचा स्वभाव होता. वडिलांनी तीन चे चार नोकर्या केल्या. टाइम्स ऑङ्ग इंडियासारख्या मोठमोठ्या ठिकाणी नोकर्या केल्या. नंतर प्रिंटिंग व्यवसाय केला. या व्यवसायामुळे मला मदत झाली. वडिलांमुळे अनेक कलाकारांची ओळख झाली.
कुटुंबात चार भावंडं आणि आई असे होतो.स्वाभिमानामुळे अनेक नोकर्या सोडल्या. त्यामुळे आम्हाला खूप फिरावे लागले. करारीपणामुळे त्रास तर झालाच, परंतु शिकलोदेखील. आता सर्व स्थिरस्थावर झालो आहोत. स्पष्ट मतामुळे कशात तडजोड केली नाही. वडिलांचा मदत करण्याचा स्वभाव माझ्या आवडीचा होता. सर्वांसोबत संवाद असल्याने अडलेल्यांची मदत करीत होते. वडिलांचे नाटकाचे गुण माझ्यात आणि माझ्या मुलीत आले आहे.
– कवी अरुण म्हात्रे
ढगाळ वातावरण,दाट धुके व अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान...! मनमाड: आमिन शेख गेल्या तीन ते चार दिवसांपासून…
नाशिक: प्रतिनिधी भंगार व्यापारी यांच्याकडून पाच हजार रुपयांची लाच घेताना गुन्हे शाखा युनिट 2 चा…
नाशिक: प्रतिनिधी केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांचा आज होणारा दौरा रद्द झाला आहे. जिल्हाधिकारी…
नवी दिल्ली: देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचे निधन झालं आहे. श्वासोश्वास घेण्यासाठी त्रास…
शिंदे टोलनाक्यावर कारला आग शिंदे:प्रतिनिधी शिंदे टोल नाक्यावर सुमारे साडेसात वाजेच्या दरम्यान सिन्नर कडुन नाशिक…
नाशिक: महापालिका आयुक्त पदाबाबत मोठी घडामोड पहावयास मिळत आहे, वादग्रस्त आयुक्त अशोक करंजकर हे वैधकीय…