आलिशान कारच्या काळ्या काचाआड दडले होते काय? पोलिसांनाही बसला धक्का!

अलिशान वाहनातून गुटख्याची तस्करी करणारा गजाआड

दोघांवर गुन्हा, 11 लाख रुपयांचा ऐवज वाहनासह जप्त

दिंडोरी : प्रतिनिधी

गेल्या अनेक महिन्यापासून वणी व परीसरात गुटख्याची तस्करी करुन पोलिसांना गुंगारा देणाऱ्या संशयितांच्या वणी पोलिसांनी मुसक्या आवळल्या.  दोन संशयीतावर गुन्हा दाखल करुन 11 लाख रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला.  एकास गजाआड टाकण्यात आले आहे.याबाबत प्राप्त माहीती अशी ,वणी व परीसरात खुलेआम गुटख्याची तस्करी होत असल्याची माहिती सहायक पोलिस उपनिरीक्षक  गायत्री जाधव यांना  मिळाल्यानंतर वणी सापुतारा रस्त्यावर पोलिस उपनिरीक्षक हेमंत राऊत व पोलिस पथकाने पाळत ठेवली असता धनाई मातेच्या मंदिराजवळ अंबानेर शिवारात MH 46 -Z -4390 या क्रमांकाची महीन्द्रा एसयुव्ही हे अलिशान वाहन आले.या वाहनाच्या काचा काळ्या केलेल्या असल्याने आतुन काही दिसणार नाही.  याची खबरदारी घेण्यात आली होती.  पोलिस उपनिरीक्षक हेमंत राऊत यांनी चौकशी केली .सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे तस्कराने दिली  तपासणी अंती  प्रतिबंधीत असलेला    गुटखा   आढळला.सदर वाहन पोलिस ठाण्यात आणण्यात आले.त्यात एकुण 20 सफेद रंगाच्या प्लास्टीकच्या गोण्या त्यापैकी प्रत्येक गोणीमधे 22 विमल पानमसाल्याची पाकिटे असे एकुण 440 पाकीटे किम्मत प्रति पॕकेट 198 रुपये एकुण किम्मत 87,120 रुपये व्हाय ब्रंट प्राॕडक्ट व्हीलेज ककाडकोपर वलसाड जिल्हा गुजरात व एकुण सफेद रंगाच्या दोन प्लास्टीकच्या गोण्या त्यापैकी प्रत्येक प्लास्टीकच्या गोणीत एकुण 10 वि – 1 तंबाखुचे पाकीटे त्यामधे 11 पुड्या असे एकुण 440 पाकीटे एकुण किम्मत 9680 रुपये नेमी प्राडक्टस् देगाम वलसाड ,राज्य गुजरात असेउत्पादकाचे नाव असुन काळ्या रंगाची महेन्द्रा  कार किंमत

दहा लाख रूपये ,एक ओपो कंपनीचा मोबाईल किम्मत 10 हजार रुपये असा एकुण 11 लाख 6 हजार आठशे रुपयांचा ऐवज जप्त केला. याप्रकरणी मजाजखान उर्फ मुज्जु रोशनखान पठाण रा.भगवतीनगर कसबे वणी व शाहीद (पुर्ण नाव नाही ) अशा दोघा तस्करांवर  गुन्हा दाखल करण्यात आला असुन मजाजखान पठाण उर्फ मुज्जु यास अटक करण्यात आली असुन शाहीदचा शोध पोलिस घेत आहेत.या तस्करीचा सखोल तपास केला तर अजुन काही नावे निष्पन्न होण्याची शक्यता आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *