दुर्घटना झाल्यास जबाबदार कोण? नागरिकांचा सवाल
सिडको : विशेष प्रतिनिधी
सिडको परिसरातील महाले फार्म येथील रस्त्याची अवस्था अतिशय वाईट होत चालली आहे. हा रस्ता प्रभाग क्रमांक 24 आणि प्रभाग क्रमांक 29 च्या सीमाभागात येत असल्याने या भागातील रस्त्यांकडे महापालिका प्रशासनासह लोकप्रतिनिधी पूर्णतः दुर्लक्ष करीत आहेत, असा आरोप नागरिकांनी केला आहे.
या रस्त्यावर दिवसातून हजारो वाहने धावत असतात. नवीन सिडको व जुने सिडको यांना जोडणारा हा एकमेव मार्ग आहे. मात्र, रस्त्यावर मोठमोठ्या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यामुळे डासांचे प्रमाण वाढत असून, परिसरात डेंग्यू, मलेरिया यांसारख्या रोगराईचा धोका निर्माण झाला आहे. याशिवाय, या खराब रस्त्यांमुळे दररोज छोटे-मोठे अपघात होत आहेत. मोठी दुर्घटना झाल्यास जबाबदार कोण? असा सवाल नागरिक करीत आहेत. दोन वर्षांपूर्वी फक्त तात्पुरत्या स्वरूपात डागडुजी करण्यात आली होती. परंतु, काही महिन्यांतच पुन्हा खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही प्रशासन आणि लोकप्रतिनिधी फक्त आश्वासनांवर वेळ काढत आहेत. सत्ताधारी पक्षाच्या एका माजी नगरसेवकाने आपल्या प्रभागात कामांचा धडाका लावला असून, त्या परिसरातील नागरिक त्या माजी नगरसेवकावर खुश असल्याचे चित्र बघायला मिळते आहे, तर उर्वरित नगरसेवक आगामी निवडणुकीची वाट पाहत बसले आहेत, अशी टीका नागरिक करत आहेत. महापालिकेची भूमिकादेखील अत्यंत उदासीन असल्याने संतप्त नागरिकांनी आता आंदोलनाचा इशारा दिला आहे.
आम्हाला मूलभूत सुविधा हव्या, आश्वासने नाहीत, असे म्हणत रस्त्याच्या अत्यंत दयनीय अवस्थेमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी आता याविरोधात एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिका आणि संबंधित नगरसेवकांनी याकडे तत्काळ लक्ष न दिल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल.
– स्वाती चौधरी, सामाजिक कार्यकर्त्या, सेक्रेटरी, शुभोदय फाउंंडेशनमहाले फार्म परिसरातील रस्ता केवळ विकासाचा नव्हे, तर लोकांच्या आरोग्याचा आणि सुरक्षेचा प्रश्न बनला आहे. आणि या प्रश्नाचे उत्तर प्रशासनाला द्यावेच लागेल.
– पूजा झनकर, स्थानिक रहिवासी
खासदार संजय राऊत यांच्यावर नांदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल नांदगाव आमिन शेख शिवसेना उद्धव बाळासाहेब…
मुलींचा सांभाळ करण्याचा कंटाळा आल्याने आईने उचलले भयानक पाऊल शहापूर : साजिद शेख शहापूर…
मंत्री गिरीश महाजन यांचा एकनाथ खडसे यांना सवाल नाशिक : प्रतिनिधी पुण्यात रेव्ह पार्टीवर पोलिसांनी…
दि. 27 जुलै ते 2 ऑगस्ट 2025 पुरुषोत्तम नाईक मेष : आप्तेष्टांच्या गाठीभेटी या सप्ताहात…
मंत्री गिरीश महाजन : सुनील बागूल, राजवाडे यांचा अखेर भाजपमध्ये प्रवेश नाशिक ः प्रतिनिधी भारतीय…
दक्षिण भारत, मध्य प्रदेशातील कांद्याच्या आवकेने भाव गडगडण्याची शक्यता लासलगाव : समीर पठाण गेल्या काही…