नाशिक

सत्तेचा ताम्रपट घेऊन आले नाही राज ठाकरे यांचे उद्धव ठाकरेंना पत्र

मुंबई :

सत्ता येते .. सत्ता जाते .. कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेले नाही . उद्धव ठाकरे तुम्ही पण नाही . राज्य सरकारला माझे सांगणे आहे . आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका , अशा शब्दांत खरमरीत पत्र राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले आहे . राज ठाकरेंनी भोंग्यांच्या प्रश्नी मनसे कार्यकर्त्यांच्या होणाऱ्या धरपकडीवर आक्रमक भूमिका घेतली आहे . आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका , असा इशारा देखील राज ठाकरेंनी यावेळी दिला आहे .
भोंगे उतरवा ‘ आंदोलनावरून गेला आठवडाभर महाराष्ट्र सैनिकांचीदडपणूक करण्यासाठी राज्य सरकार ज्या पद्धतीने पोलीस बळाचा वापर करत आहे ते पाहता मला प्रश्न पडलाय की , मशिदीमध्ये लपवून ठेवलेली शस्त्रास्त्रे आणि अतिरेकी शोधून काढण्यासाठी अशी धरपकड मोहीम राज्य सरकारने किंवा पोलिसांनी कधी राबवली होती का ?, असा सवाल राज ठाकरेंनी यावेळी उपस्थित केला.राज ठाकरे आपल्या पत्रात म्हणाले , महाराष्ट्र राज्य सरकार बेभान होऊन अंगात आल्यासारखं वागत आहे . आमचा संदीप देशपांडे आणि इतरही अनेक कार्यकर्त्यांना पोलीस असे काही शोधत आहेत . जणू ते पाकिस्तानातून आलेले अतिरेकी किंवा निजामाच्या हैदराबाद संस्थानातले रझाकार आहेत ! अर्थात , महाराष्ट्र सैनिकांविरोधात ही अत्याचारी , दमनकारी कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना कुणी दिलेत हे समस्त मराठीजन , तमाम हिंदूजन उघड्या डोळ्यांनी बघत आहेत . तब्बल २८ हजार महाराष्ट्र सैनिकांना पोलिसांनी प्रतिबंधात्मक नोटिसा बजावल्या हजारोंना तडीपार केलं आणि अनेकांना तुरुंगात डांबलं . राज्य सरकारला माझे एकच सांगणं आहे . आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका . सत्ता येत जात असते . कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही . उद्धव ठाकरे , तुम्हीही नाही !

Ashvini Pande

Recent Posts

श्रमिकनगरला टवाळखोरांनी वाहनांच्या काचा फोडल्या

नाशिक: प्रतिनिधी शहरात टवाळ खोरांनी मोठा उच्छाद मांडला असून, वाहनांच्या काचा फोडणे, तोडफोड करणे, कोयता…

1 day ago

नाशिकच्या पोलीस अधीक्षकपदी बाळासाहेब पाटील

नाशिक: प्रतिनिधी राज्यातील आयपीएस दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या आज शासनाने बदल्या केल्या. नाशिकचे पोलीस अधीक्षक म्हणून पालघर…

2 days ago

डॉ. जयंत नारळीकर यांचे निधन

नाशिक: प्रतिनिधी ज्येष्ठ खगोल तज्ज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचे आज निधन झाले. ते 86 वर्षांचे…

4 days ago

भुजबळ फार्मवर कार्यकर्त्यांचा जल्लोष

भुजबळ फार्मवर कार्यकर्त्यांचा जल्लोष छगन भुजबळांचे दमदार पुनरागमन सिडको: दिलीपराज सोनार ज्येष्ठ नेते छगन भुजबळ…

4 days ago

छगन भुजबळ मंत्रिमंडळात,उद्या मुंबईत शपथविधी

छगन भुजबळ मंत्रिमंडळात उद्या मुंबईत शपथविधी नाशिक : प्रतिनिधी मंत्रिपद न मिळाल्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून…

5 days ago

राशीभविष्य

12 राशींचे राशीभविष्य मेष रास  मेष राशीच्या लोकांनो आज प्रवास करताना कोणताही धोका पत्करू नका,…

5 days ago