शहरात पावसाळापूर्व नालेसफाईची कामे सुरु

 मे अखेरपर्यंत कामे पूर्ण करण्याचे आयुक्तांचे आदेश
नाशिक : प्रतिनिधी
नाशिक महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाकडून शहरात पावसाळापूर्व नालेसफाईची कामे सुरु करण्यात आली आहेत. पावसाळा पूर्वी ही कामे केली जातात. पूर परिस्थिती टाळण्यासाठी बांधकाम विभागाकडून शहर भर ही कामे केली जातात.त्यानुसार पावसाळी गटार, नाले, चेंबरची साफसफाई केली जात आहेत. मे महिन्याच्या अखेरपर्यंत शहरातील सहा विभागातील नाले सफाईची कामे पूर्ण करण्याचे उद्दीष्ट आहे.
गुरुवारी (दि.27) पश्चिम विभागात मनपा मुख्यालय राजीव गांधी भवनच्या गेटच्या जवळ नालेसफाई सुरु आहे. चेंबर कव्हरचे होल साफ करण्यात येत आहे. तसेच उंटवाडी पुलाजवळील म्हसोबा मंदिराजवळ आणि सिटी सेंटर मॉल चौकात रस्त्यालगत पावसाळी नाली तयार करून पाणी काढण्यासाठी उपाययोजना करण्यात आली आहे.शहरात दरवर्षी या कामांना सुरवात करण्यात आली गडकरी चौक परिसरातील आणि एन. डी. पटेल रोड, भद्रकाली दूध बाजार परिसरातील पावसाळी चेंबरची साफसफाई करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. याच विभागातील सरस्वती नाला चेंबरच्या जाळ्या साफ करण्यात आल्या आहेत. मॅग्नम हॉस्पिटल येथील जाळीचे चेंबर दुरुस्ती करण्यात येऊन नवीन जाळी टाकण्यात आली आहे. त्याशिवाय भद्रकालीमधील निंब हनुमान मंदिरामागील तुटलेल्या लोखंडी जाळीची दुरुस्ती करण्यात आली आहे. पावसाळ्यात नाले, गटारी तुंबून पाणी रस्त्यावर येऊ नये याची पुरेपूर दक्षता महानगरपालिकेकडून घेतली जाणार आहे. त्यानुसार शहर अभियंता शिवकुमार वंजारी यांच्या सुचनेनुसार ठिकठिकाणी कामे हाती घेण्यात आली आहेत. पश्चिम विभागात कार्यकारी अभियंता सचिन जाधव, उभ अभियंता नितीन राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पावसाळा पूर्व नालेसफाईची कामे सुरु आहेत.
पश्चिम विभागासह मनपाच्या इतरही विभागात बांधकाम विभागाकडून कामे सुरु आहेत. पंचवटी विभागात प्रभाग क्रमांक ६ मध्ये घाडगेनगर येथील मोठ्या नाल्याची साफसफाई सुरू आहे. मार्च महिन्यात याच विभागातील रामवाडी नाल्याची सफाई करण्यात आली होती. सातपूर प्रभाग क्रमांक १० मध्येही प्रगती विद्यालयाजवळ नाल्याची साफसफाईचे काम सुरु आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *