रस्ता सुरक्षा अभियान बैठकीत ब्लॅक स्पॉटसह विविध मुद्यांवर चर्चा
नाशिक : प्रतिनिधी
मुंबई नाका सर्कल येथील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना करण्याचा निर्णय रस्ता समितीच्या बैठकीत घेण्यात आला. या परिसरातदोन अंडर पास मार्ग असावेत तसेच एकेरी मार्ग करावा व एसटीची वाहतूक वळवावी अशा सूचना यावेळी काण्यात आलय. तसेच शहरातील 26 ब्लॅक स्पॉट असून या भागात सुधारणा कामे करण्यासाठी दोन दिवसात नीविदा काढली जाणार आहे. यासह बैठकीत शहरातील ब्लॅक स्पॉट, वाहतूक कोंडी, सिग्नल यंत्रणा अशा विविध मुद्यांवर सखोल चर्चा झाली.
रस्ता सुरक्षा समितीची त्रैमासिक बैठक मंगळवारी ( दि. 1) पंचवटी विभागीय कार्यालयातील सभागृहात झाली. यावेळी पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.बैठकीत अपघात प्रवण क्षेत्र सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना करण्याबाबत बैठकीत मंथन झाले. पायलट टेस्टींग म्हणून पोलीस, मनपा व रेसिलियंट इंडीया संयुक्तपणे सिव्हीरीटी इंडेक्स ई- एन्फोर्समेंट सिस्टीमची पडताळणी करणार आहेत. मुंबई नाका सर्कल येथील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना करण्याचा निर्णय घेण्यात आला. तेथे दोन अंडर पास मार्ग असावेत, एकेरी मार्ग करावा, एसटीची वाहतूक वळवावी अशा सुचना बैठकीत पुढे आल्या आहेत. शहरातील जे ब्ल्ॅक स्पॉट आहेत. त्यामध्ये मुंबई आग्रा राष्टीय महामार्गावर 6, पुणे राष्ट्रीय महामार्गावर र्4, औरंगाबाद महामार्गावर 4 1 पेठ रोड 1, दिंडोरी रोड 1, त्रंबक रोड 3 व मनपा रस्त्यावरील 7 अपघात प्रवण क्षेत्र आहेत. महापालिका आयुत डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार म्हणाले, ट्रक टर्मिनल विकसीत होण्याची गरज असल्याच त्यांनी म्हटले, तसेच शहरातील सर्व सिग्नल यंत्रणेची जबाबदारी मनपाच्या विद्युत विभागाने घ्यावी अशी सुचनाही त्यांनी केली. शहरात एकूण 47 सिग्नल असून मनपाचे 40 सिग्नल आहेत. काट्या मारुती, मखमलाबाद नाका, सेवाकुंज, संतोष टी पॉईंट, स्वामी नारायण चौक, वडाळा नाका, पाथर्डी फाटा हे सात सिग्नल त्वरीत सुरु करण्याचा आदेश मनपा आयुक्तांनी दिला. डीसीपी पौर्णिमा चौगुले यांनी वाहतूक पोलिसांना सिग्नलजवळ विश्रांती घेण्यासाठी छोटी शेड असावी अशी सुचना केली. त्यावर सीएसआर फंडातून हे काम निश्चितपणे केले जाईल, असे आश्वासन मनपा आयुक्तांनी दिले. शहरात ट्रक टर्मिनस विकसीत होण्याची मोठी गरज असल्याचे मनपा आयुक्तांनी यावेळी सांगितले. त्यासाठी त्यांनी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील ट्रक टर्मिनसचे उदाहरण दिले. ब्लॅक स्पॉटचे सर्व्हेक्षण पूर्ण झाले असून शहरातील रस्त्यांवरील 343 ठिकाणी अनधिकृत बांधकामाबाबत नगर नियोजन विभागाने नोटीसा दिल्या आहेत. लवकरच अतिक्रमण विभागाकडून कारवाई केली जाणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. इंदिरानगरजवळील उड्डाणपूलाच्या प्रस्तावित बोगदा विस्ताराच्या कामाची तज्ज्ञांनी पाहणी केली असून 3-4 महिन्यात कामाला सुरुवात होईल, अशी माहिती एनएचएआयचे बी. एस. साळुंखे व डी आर पाटील यांनी दिली. मनपा शहर अभियंता शिवकुमार वंजारी यांनी मागच्या बैठकीचं इतिवृत्त वाचून सुरु असलेल्या कामांची माहिती दिली. बैठकीच्या शेवटी उपस्थित सर्व मान्यवर अधिका-यांचे आभार मानले.मनपा अतिरीक्त आयुक्त प्रदीप चौधरी, स्मार्ट सिटीचे सीईओ सुमंत मोरे, प्रादेशिक परीवहन अधिकारी प्रदीप शिंदे, पीडब्लूडीचे अधिक्षक अभियंता प्रशांत सोनवणे, कार्यकारी अभियंता उदय पालवे, रेजिलियन्ट इंडिया कंपनीचे राजीव चौबे व प्रियंका लखोटे, शासकीय तंत्रनिकेतनचे प्रा. रविंद्र सोनोने आणि मनपाच्या बांधकाम, नगर नियोजन, अतिक्रमण, विद्युत, मिळकत, उद्यान विभागांचे प्रमुख बैठकीला उपस्थित होते
स्पीड ब्रेकरसाठी समिती नेमली जाणार
अपघात होउ नये याकरिता स्पीड ब्रेकर बसवले जाणार आहे. दरम्यान स्पीड ब्रेकर बसवण्याचा निर्णय घेण्यासाठी तज्ज्ञांची समिती नेमण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. या समितीमध्ये मनपा, एनएचएआय, पीडब्लूडी, आरटीओ, पोलिस विभागातील अधिकारी आणि के. के. वाघ इंजिनिअरींग कॉलेजमधील डॉ. विलास पाटील, शासकीय तंत्रनिकेतनचे प्रा. रविंद्र सोनोने या सर्वांचा समावेश असणार आहे. स्पीड ब्रेकर लावण्याने अपघात कमी होणार का? याचा अभ्यास करावा तसेच अपघात झालेल्या ठिकाणी अपघातांची आकडेवारी असलेला फलक लावणे योग्य राहील अशी सुचना पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी केली. तसेच रात्रीच्या वेळी झाडे दिसण्यासाठी प्रकाशाचा झोत टाकण्याची सुचना त्यांनी केली.