पाऊस काही थांबेना, खड्डे काही बुजेना!

खड्डे चुकविण्यासाठी वाहनधारकांची कसरत
नाशिक ः देवयानी सोनार

शहरात पावसामुळे पडलेले खड्डे एकीकडे बुजविण्यात आल्याचा दावा महापालिकेकडून केला जात असला तरी पावसाची संततधार सुरूच असल्याने शहरातील रस्ते पुन्हा खड्डेमय झाले आहेत. खड्डे बुजविण्याचा खर्चही यामुळे वाया गेला आहे.
मनपा आयुक्तांनी खड्डे बुजविण्याचे ठेेकेदारांना आदेश दिल. परंतु त्यानंतरही शहरातील खड्डे जैसे थे आहेत. खड्डे भरण्यासाठी माती,मुरूम तसेच पेव्हर ब्लॉक टाकून तात्पुरती डागडुजी करण्यात येत आहे.या डागडुजीमुळे रस्त्यावरून वाहने चालविणे जिकिरीचे झाले आहेत.खड्डयांमुळे कमरेचे व मानेचे विकार वाढले आहेत.
पंधरा दिवसांपासून पावसाने राज्यभरात थैमान घातले आहे.अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार आणि ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळत असल्याने अचानकपणे रस्त्यावर पाणी भरत आहे. पाणी वाहून जाण्यास जागा किंवा जमीन नसल्याने पाण्याचा निचरा होत नाही.वाहनधारकांना रस्त्यांचा अंदाज न आल्याने घसरुन मार लागण्याच्या घटना वाढत आहेत.खड्डयातून प्रवास करण्यामुळे वाहनेही खिळखिळी होत आहेत. आधीचा खड्डा बुजत नाही तोच पुन्हा तो उखडला जात आहे.खड्डयातील मुरूम,माती कच इतरत्र पसरून गाडी घसरण्याचे प्रमाण वाढले आहे. ऊन पडून रस्ता सुकला की धुळीचे साम्राज्य होत आहे. त्यामुळे श्‍वसन विकार,हाडांचे आजार वाढले आहेत. खड्ड्यात गाडीचे हॅन्डल फिरले जाऊन गाडीचालक पडण्याचेे प्रमाण वाढले आहे.
शहरातील काही रस्ते सिमेंटचेे आहेत. नाशिकरोड, मुंबई नाका,सिटीसेंटर चौक,सीबीएस,शालीमार,कॉलेजरोड,पंचवटी या परिसराबरोबर सिडको सातपूर आदी उपनगरांतील रस्त्यांची चाळण झाली आहे.उड्डाणपुलावर मागच्या आठवडयात झालेल्या पावसाने पाणी साचून खड्डयांचे साम्राज्य पसरल्याचे चित्र आहे.या पुलावरून अनेक अवजड वाहने ये जा करीत असल्याने वेगमर्यादा आणि अचानक आलेले खड्डयांमुळे अपघाताची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
125 अपघात
जानेवारी ते 15 सप्टेंबरपर्यंत राष्ट्रीय,राज्य आणि इतर मार्ग असे एकूण125 अपघात झाले आहेत. खड्डयांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले असून, मुंबई, ठाण्यात खडड्यंामुळे दोन जणांनी जीव गमावला होता. त्यामुळे खडडे अपघाताला निमंत्रण देणारे ठरत आहे.

 

Bhagwat Udavant

Recent Posts

साकोरा येथे गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठी चार्ज

गाडीत पैसे असल्याच्या संशयावरून राडा साकोरा येथे गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठी चार्ज नांदगांव /…

2 days ago

जुने नाशिक भागात आमदार फरांदे यांनी साधला सवांद

नाशिक : प्रतिनिधी नाशिक मध्यचे दोन्ही उमेदवार देवयानी फरांदे आणि वसंत गीते एकाच वेळी  आल्याने…

2 days ago

नांदगावमध्ये सुहास कांदे आणि समीर भुजबळांमध्ये राडा

नांदगाव: येथील मतदार संघात आज समीर भुजबळ आणि सुहास कांदे यांच्यात आज पुन्हा राडा झाला.…

2 days ago

यांनी बजावला मतदानाचा हक्क

नाशिक: लोकशाहीचा उत्सव असलेल्या मतदानास सकाळी 7 वाजेपासून सुरुवात झाली आहे, मतदानाचा हक्क बजावत अनेकांनी…

2 days ago

जिल्ह्यात पहिल्या दोन तासात ६. ८९ टक्के मतदान

  जिल्ह्यात पहिल्या दोन तासात ६. ८९ टक्के मतदान नाशिक मध्य मध्ये दोन तासात सर्वाधिक…

2 days ago

बनकर, कदम यांनी बजावला मतदानाचा हक्क

निफाड:- प्रतिनिधी निफाड विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उ बा ठा चे उमेदवार माजी आमदार अनिल कदम…

2 days ago