नाशिक

महापालिका निवडणुकीत मातब्बरांची प्रतिष्ठा पणाला

पंधरा ठिकाणी लक्षवेधी लढती; वर्चस्व गाजवणारे एकमेकांविरोधात

नाशिक : प्रतिनिधी
नाशिक महापालिकेसाठी आठ वर्षांनंतर आज (दि.15) मतदान होत आहे. महापालिका प्रशासनाने निवडणुकीची तयारी केली आहे. दरम्यान, महापालिका निवडणुकीत दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. 122 जागांपैकी 15 लक्षवेधी लढती असून, अख्ख्या नाशिकचे लक्ष या लढतींकडे लागले आहे. महापालिकेवर वर्चस्व असलेल्या प्रमुख पदाधिकार्‍यांमध्ये घमासान होणार असल्याने कोणाच्या अंगावर गुलाल पडणार, याची उत्सुकता वाढली आहे. दरम्यान, यंदा कुठे पक्षाचे नेते, उपनेते, तर कुठे माजी महापौर, उपमहापौर यांच्यातील लढती प्रतिष्ठेच्या झाल्या आहेत.

राज्याच्या सत्तेत प्रमुख पक्ष असलेला भाजप मनपा निवडणूक स्वबळावर लढविण्याचा निर्णय घेत महायुतीतून बाहेर पडला. त्यामुळे महायुतीच्या प्रतीक्षेत असलेले शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट भाजपला वगळून युतीद्वारे निवडणूक रिंगणात उतरले आहेत. या निवडणुकीसाठी शंभर प्लसचा नारा देणार्‍या भाजपने 122 पैकी 118 ठिकाणी उमेदवार दिले आहेत. परंतु एबी फॉर्मच्या गोंधळामुळे तीन जागांवर अपक्षांना पुरस्कृत करण्याची वेळ पक्षावर आली. शिवसेना शिंदे गटाने 80 उमेदवार देत भाजपला आव्हान दिले आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटानेही 30 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविले आहेत.
दुसरीकडे शिवसेना ठाकरे गट, मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट या महाविकास आघाडीनेही 165 उमेदवार दिले आहेत. या निवडणुकीत 87 माजी नगरसेवक पुन्हा निवडणूक रिंगणात उतरले असले, तरी शहरातील 122 पैकी 15 जागांवरील लढती लक्षवेधी बनल्या आहेत. त्यात प्रभाग 1, 5, 7, 13, 15, 16, 17, 20, 24, 25, 29, 30. या पंधरा लढतींमध्ये महापालिकेतील प्रमुख पदाधिकारी एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. त्यामुळे या लढतींत कोण बाजी मारणार याकडे आता शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

बिग फाइट
प्रभाग 1 : अरुण पवार (भाजप) विरुद्ध प्रवीण जाधव (शिंदेसेना), प्रभाग 5 : गुरुतिम बग्गा विरुद्ध अशोक मुर्तडक (अपक्ष), प्रभाग 7 योगेश हिरे विरुद्ध अजय बोरस्ते (शिंदेसेना), प्रभाग 12 ः शिवाजी गांगुर्डे (भाजप) विरुद्ध समीर कांबळे (शिंदेसेना), प्रभाग 12 : डॉ. हेमलता पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट) विरुद्ध नूपुर सावजी (भाजप), प्रभाग 13 : शाहू खैरे (भाजप) विरुद्ध गणेश मोरे ( शिंदेसेना), प्रभाग 15 : मिलिंद भालेराव (भाजप) विरुद्ध प्रथमेश गिते (शिवसेना उबाठा), प्रभाग 16 : राहुल दिवे (शिंदेसेना) विरुद्ध कुणाल वाघ (भाजप), प्रभाग 17 : राजेश आढाव (शिंदेसेना) विरुद्ध दिनकर आढाव (भाजप). प्रभाग 20 : संभाजी मोरुस्कर (भाजप) विरुद्ध हेमंत गायकवाड (शिवसेना उबाठा), कैलास मुदलियार (शिंदेसेना). प्रभाग 24 : कैलास चुंभळे (भाजप) विरुद्ध प्रवीण तिदमे (शिंदेसेना), प्रभाग 25 : सुधाकर बडगुजर (भाजप) विरुद्ध अ‍ॅड. अतुल सानप (शिंदेसेना), प्रभाग 29 : दीपक बडगुजर (भाजप) विरुद्ध मुकेश शहाणे (अपक्ष), प्रभाग 30 : अजिंक्य साने (भाजप) विरुद्ध सतीश सोनवणे (राष्ट्रवादी काँग्रेस).

अजय बोरस्ते विरुद्ध योगेश हिरे

प्रभाग क्रमांक 7 मध्ये होणारी लढत अत्यंत लक्षवेधी असणार आहे. पंडित कॉलनी, गंगापूर रोडचा हा परिसर असून, या ठिकाणी शिंदेसेनेचे अजय बोरस्ते विरुद्ध भाजपचे योगेश हिरे या दोघांत चुरशीची लढत आहे. बोरस्ते मूळचे भाजपचेच; परंतु आता ते शिंदेसेनेचे उपनेते आहेत. ते सातत्याने या प्रभागातून निवडून येत आहेत. गेल्या वेळी या प्रभागातून शिवसेनेकडून केवळ बोरस्ते हेच निवडून आले होते. दुसरीकडे, योगेश हिरे सलग दुसर्‍यांदा निवडणूक लढवत आहेत. दोघांचा मित्र परिवार, संपर्क यामुळे जमेची बाजू आहे. पण अजय बोरस्ते यांच्या दृष्टीने ही निवडणूक अधिक चुरशीची असणार आहे. आमदार प्रा. देवयानी फरांदे व आमदार सीमा हिरे यांनी योगेश हिरे यांना निवडून आणण्यासाठी कमालीचा जोर लावला आहे.

अशोक मुर्तडक विरुद्ध गुरुमित बग्गा

पंचवटी विभागात येत असलेल्या प्रभाग पाचमधील लढतीकडेदेखील शहराचे लक्ष असेल. मनसेची सत्ता असताना महापौर राहिलेले अशोक मुर्तडक व उपमहापौर राहिलेले गुरुमित बग्गा हे माजी महापौर व उपमहापौर समोरासमोर उभे ठाकले आहेत. मागील वेळेस अशोक मुर्तडक यांनी प्रभाग सहामधून उमेदवारी केली होती. अशोक मुर्तडक आणि गुरुमित बग्गा दोघांचाही अनुभव आणि कारकीर्द चांगली आहे. परंतु यावेळी अशोक मुर्तडक यांनी निवडणुकीच्या आधी भाजपत प्रवेश केला होता. भाजपने उमेदवारी नाकारल्याने मुर्तडक यांनी शिंदेसेनेची वाट धरली. बग्गा यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. या माजी महापौर व उपमहापौरांच्या लढतीत कोण बाजी मारेल, हे येत्या शुक्रवारी (दि. 16) समजेल. तत्पूर्वी, उत्कंठा ताणली गेली आहे.

संजय चव्हाण विरुद्ध राहुल शेलार

संजय चव्हाण आणि गजानन शेलार यांच्यात 2012 मध्ये झालेली अटीतटीची लढत अजूनही चर्चिली जाते. प्रभाग क्रमांक 13 सध्या संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेत आहे. माजी नगरसेवक संजय चव्हाण (शिवसेना उबाठा) आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे शहराध्यक्ष गजानन शेलार यांचे पुतणे राहुल शेलार (भाजप) यांच्यात थेट लढत होणार आहे. या प्रभागात निवडणूक चुरशीची होण्याची चिन्हे आहेत.

प्रथमेश गिते विरुद्ध मिलिंद भालेराव

प्रभाग क्रमांक 15 हा यंदा राजकीय प्रतिष्ठेचा केंद्रबिंदू ठरत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार वसंंत गिते यांचे पुत्र तथा माजी उपमहापौर प्रथमेश गिते यांच्याविरोधात भाजपचे मिलिंद भालेराव अशी लढत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे महानगरप्रमुख प्रथमेश गिते दुसर्‍यांदा रिंगणात उतरले आहेत. एका बाजूला राजकीय वारसा, तर दुसर्‍या बाजूला भाजपची संघटनात्मक ताकद, असा हा सामना असेल.

अजिंक्य साने विरुद्ध सतीश सोनवणे

प्रभाग 30 मध्ये भाजपचे अजिंक्य साने व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार सतीश सोनवणे यांच्यात काट्याची लढत होणार आहे. अजिंक्य साने भाजपचे ज्येष्ठ नेते विजय साने यांचे चिरंजीव आहेत. ते यापूर्वी स्वीकृत नगरसेवक होते. सतीश सोनवणे यापूर्वी दोन वेळा भाजपकडून निवडून आले आहेत. यावेळी मात्र त्यांना भाजपने तिकीट नाकारल्याने त्यांनी राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाकडून उमेदवारी करत कडवे आव्हान उभे केले आहे.

The reputation of the elders is at stake in the municipal elections.

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

दादांची अकाली एक्झिट ! जिल्हा शोकसागरात

सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…

4 hours ago

स्मार्ट पार्किंगचे घोडे अडलेलेच!

टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…

4 hours ago

बांगलादेश क्रिकेट बोर्डाचा आत्मघातकी निर्णय

बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्‍या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…

5 hours ago

अजितदादांची साथ नेहमी स्मरणात राहील!

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…

5 hours ago

पवार परिवारावर आघात

महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…

5 hours ago

मीठसागरे शिवारात बिबट्या मादी जेरबंद

सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…

5 hours ago