नाशिक प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्यामार्फत मार्च एप्रिल 2022 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल आज दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या निकालंडळाच्या संकेतस्थळावर पाहता येणार आहे.
दहावीचा नवीन निकाल येथे पाहता येणार
WWW.maharesult.nic.in
http://sscresult.mkcl.org
https://ssc.maharesults.org.in
दहावीच्या परीक्षेसाठी एकूण 16 लाख 39 हजार 172 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती यामध्ये आठ लाख 89 हजार 584 विद्यार्थी तर सात लाख 49 हजार 487 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.
मार्च एप्रिल 2022 च्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता दहावी परीक्षेचे सर्व विषयांसह प्रविष्ट होऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दोनच संधी श्रेणी आणि गुण सुधार योजनेअंतर्गत उपलब्ध असणार आहेत.
जुलै-ऑगस्ट 2022 मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता दहावी पुरवणी परीक्षेसाठी पुनर्परीक्षा अर्थी व श्रेणी सुधार विद्यार्थ्यांसाठी सोमवार दिनांक 20 पासून मंडळाच्या संकेतस्थळावरुन ऑनलाईन पद्धतीने आवेदन पत्र भरून घेण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांना गुणपत्रिका वाटपाबाबत नंतर कळविण्यात येणार आहे
टायर फुटल्याने बिंग फुटले सिन्नर : प्रतिनिधी समृद्धी महामार्गावरून वैजापूर येथून मुंबईकडे निघालेल्या एका कारचे…
आता जनावरांची वाहतूक होणार सुरक्षित सिडको विशेष प्रतिनिधी -भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान (DST) आणि…
सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मोहदरी - चिंचोली परिसरातील वन विभागाच्या डोंगराला अज्ञात कारणास्तव लागलेल्या आगीत…
आपल्या लाडक्या लहान बहिणीच्या लग्नासाठी मेहनत करुन जतन करून ठेवलेली सुमारे पावणे दोन लाख रुपयांची…
नाशिक : प्रतिनिधी आदिवासी विकास विभागाकडून आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना सामाजिक-भावनिक शिक्षण देण्यासाठी स्लॅम आउट लाउड आणि…
जिल्हा परिषदेच्या आरोग्याधिकार्यांना निवेदन नाशिक : प्रतिनिधी शासनाने ग्रामीण भागात काम करणार्या आरोग्य कर्मचार्यांना बायोमेट्रिक…