युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम
नाशिक ः प्रतिनिधी
अमेरिका- इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर सुकामेव्यात 150 ते 200 रुपये प्रतिकिलो वाढ होण्याची शक्यता शहरातील सुकामेवा विक्रेत्यांनी वर्तवली आहे. सुकामेव्याचे दर सध्या स्थिर असले, तरी युद्धाच्या पार्श्वभूमीवर जवळपास 5 टक्के किंवा युद्ध दीर्घकाळ चालले तर अजून दरवाढ होण्याची शक्यता असल्याचे नीलेश ड्रायफ्रूटचे नीलेश पटेल यांनी सांगितले.
सध्या रमजान ईद सुरू असून, या दिवसांत मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात सुकामेव्याची खरेदी करतात. दरवाढीने सणावर परिणाम होणार आहे.
अमेरिका-इस्राईल आणि इराण युद्ध सुरू होऊन तीन ते चार दिवस झाले आहेत.त्यामुळे भारतातही इंधन, सोने-चांदी, सुकामेवा आदी आयातीवर परिणाम होणार आहे. आपण अफगाणिस्तानवरून जर्दाळू, काळ्या मनुका, अंजीर, शहाजिरा, तर इराणवरून पिस्ता आयात करतो. सध्या अंजीर 1600 रुपये किलो, जर्दाळू 780 रुपये, शहाजिरा 1250 रुपये, काळ्या मनुका 450 रुपये, पिस्ता 1300 ते 1400 रुपये प्रतिकिलो आहे. भाववाढ झाल्यास प्रतिकिलो 150 ते 200 रुपयांनी सुकामेवा महाग होण्याची शक्यता आहे.
खजूर, सुकामेवा यांच्या आयातीवरदेखील याचा परिणाम झाला आहे. काजू, बदाम, चारोळी, खसखस आणि खजूर अमेरिका, सौदी अरेबिया, इराणमधून आयात होते. वेगवेगळ्या प्रकारचा खजूर इराण व सौदी अरेबियातून येतो. या देशांत युद्ध सुरू झाल्याने मध्यपूर्व भागातील देशांतील विमानसेवा बंद करण्यात आल्याने संपर्क तुटला आहे. त्यामुळे आयातीवर परिणाम झाला आहे. व्यावसायिकांनी रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर आधीच साठा करून ठेवल्याने दर स्थिर आहेत. युद्ध लांबल्यास त्याचा परिणाम दरावर होऊ शकतो.
150 ते 200 रुपयांची वाढ शक्य
अमेरिका-इस्रायल आणि इराण युद्धामुळे पुरवठा एकदमच बंद असून, रमजानमुळे सुकामेव्याला मागणी जास्त आहे. पुरवठा होत नसल्याने सुकामेव्याचे भाव अजून वाढू शकतात.
– नीलेश पटेल, सुकामेवा व्यापारी
सध्याचे दर असे (प्रतिकिलो)
अंजीर – 1600 रुपये
जर्दाळू – 780 रुपये
काळ्या मनुका – 450 रुपये
पिस्ता – 1300 ते 1400 रुपये
काजू – 800 ते 1000 रुपये
बदाम – 1000 ते 2000 रुपये
पिस्ता – 2500 ते 3500 रुपये
खजूर – 400 ते 2000 रुपये
अक्रोड – 1500 ते 2400 रुपये
चारोळी – 2000 ते 3000 रुपये
खसखस – 1800 ते 2200 रुपये
खोबरे – 400 ते 600 रुपये
The result of warlike conditions
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…