एका संशयिताला पोलिसांनी घेतले ताब्यात
सिडको : विशेष प्रतिनिधी
:सातपूर येथील रिक्षाचालकाचा टोळक्यांच्या हल्ल्यात खून होऊन २४ तासही उलटत नाही तोच पांडवलेणी येथे एकाचा खून झाल्याची घटना आज घडली,पांडवलेणी परिसरात जुन्या वादातून खुन झाल्याची माहिती पुढे येत आहे. पांडवलेणीच्या पायथ्याशी असलेल्या हॉटेल माउंटन समोर रविवारी रात्रीच्या सुमारास जुन्या वादातुन तीन ते चार हल्लेखोरांनी तलवारी घेऊन परिसरात दहशत माजवली.यात जुना वाद उफाळून आला असुन रामदास नारायण बोराडे (वय १९ रहा ज्ञानगंगा सोसायटी )नामक तरुणाचा तलवारीच्या हल्ल्यातुन खून झाला तर अन्य राजेश सुदाम बोराडे गंभीर जखमी झाला आहे या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्यासह पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते.या प्रकरणी एका संशयिताला पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले आहे दरम्यान हल्लेखोरांनी माऊंटन व्ह्यू हॉटैलच्या बाहेर पार्क केलेल्या चारचाकी गाड्यांच्या काचा फोडून मोठे नुकसान केले. हॉटेल मॅनेजर रोशन मेणे यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्यावरही तलवारीने हल्ला करण्याचा प्रयत्न झाला.हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे
तत्पूर्वी हल्लेखोरांनी हॉटेलखालील रहिवासी वसाहतीत घुसून दोघांवार केला होता. त्यातील रामदास बोराडे नावाच्या तरुणावर तलवारीने वार केले यात तो गंभीर जखमी असून त्याच्यावर पाथर्डी फाटा येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले आहे तर राजेश सुदाम बोराडे हा गंभीर जखमी आहे घटनास्थळी पोलीस दाखल होताच आरोपींनी त्यांच्यावरही तलवार उगारण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे
या संपूर्ण प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत संशयितांना ताब्यात घेतले. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. मात्र, रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता. घटनास्थळी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलीसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असून पुढील तपास इंदिरानगर पोलीस करीत आहेत
नाशिक: प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने तिकीट न दिल्यामुळे नाराज झालेल्या कॉंग्रेस प्रदेश प्रवक्त्या हेमलता पाटील…
मनमाडला रेल्वे कर्मचाऱ्याचा कांदे भरत असतांना शॉक लागून मृत्यू मनमाड : प्रतिनिधी मनमाडनजीक असलेल्या नागापूर…
8 लाख 75 हजार 912 शेतकर्यांची फार्मर आयडीकडे पाठ सिन्नर : भरत घोटेकर कृषी विभागाच्या…
दोन लाखांचे नुकसान; ऐन उन्हाळ्यात जनावरांच्या तोंडचा घास हिरावला सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील घोटेवाडी येथील…
नाशिक : प्रतिनिधी भारतीय वंशाच्या अमेरिकेत वास्तव्य असलेल्या दातृत्वाने नर्गिंस दत्त विद्यालयातील 20 मुलींना नवीन…
उपनगर वार्ताहर: उपनगर-गांधीनगर संयुक्त जयंती समितीतर्फे यावर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आगळ्यावेगळ्या प्रबोधनात्मक पद्धतीने साजरी…