खामखेड्यातील सालगड्याचा मुलगा झाला पोलीस

खामखेड्यातील सालगड्याचा मुलगा झाला पोलीस

आदिवासी कुटुंबातील मुलाने प्रतिकूल परिस्थितीत मिळविले यश

महेश शिरोरे
खामखेडा: प्रतिनिधी
पाचवीला पूजलेली गरिबी, घरात अठराविश्वं दारिद्र्य,त्याच्यावरच कुटुंबाची गुजराण या सर्वांवर मात करत दुसऱ्याच्या शेतात सालावर राहून काम करून अविनाश ने मिळवले यश

– पाचवीला पूजलेली गरिबी, घरात अठराविश्वं दारिद्र्य,गावातील जिल्हा परिषद ,जनता विद्यालय शाळेत शिक्षण घेत,वडिलोपार्जित मजुरीवर च आदिवासी कुटुंबाची गुजराण; मात्र नुसती पोटाची आग विझली म्हणजे संसार होत नाही, पोरांना शिकवणं, त्यांच्या उज्जवल भवितव्यासाठी प्रयत्न करणे म्हणजे खरे पालकत्व. ती जबाबदारी ओळखून वडिल गुलाब सोनवणे व आईं अंजनाबाई यांनी ४० वर्ष दुसऱ्याच्या शेतात मोल मजुरी काम करून चार पैसे गाठीला बांधून गुलाब रामा सोनवणे यांनी अविनाश ला चांगलं शिक्षण दिले आणि त्याचे चीज करीत अखेर अविनाशनेही स्वतःच्या हिमतीवर, महाराष्ट्र मुंबई पोलीस होण्याचा मान मिळवून , मुंबई पोलीस या पदाला गवसणी घातली आणि सालगड्याच्या पोराने अतिशय प्रतिकूल परिस्थितीत मिळविले यश पाहून सारा खामखेडा गाव गहिवरून गेला.ही कहाणी आहे अविनाश गुलाब सोनवणे या तरुण तडफदार आणि तितक्याच सहनशील आणि चिकाटीवृत्तीच्या मुलाची आणि त्याच्या जिद्दी वडिलांची. देवळा तालुक्यातील जेमतेम चार ते साडे चार हजार लोकसंख्येचे गाव असलेल्या खामखेडा येथील सामान्य कुटुंबातील सालगडी म्हणून काम करणाऱ्या मजुराच्या मुलाने जिद्दीच्या जोरावर, काबाड कष्ट,करून स्वतःच्या हिमतीवर मुंबई पोलीस पदाला गवसनी घातली.घरातील तुटपुंजी परिस्थिती असताना त्यात मेहेनत करून त्याला जोड म्हणून मटण,चिकन चा व्यवसाय करत गुलाब सोनवणे यांनी अविनाश याचे शिक्षण जिद्दीने पूर्ण केले. बारावीनंतर, बी ए ला प्रवेश घेत शिक्षणाबरोबर व्यवसायात मदत करून , देवळा येथील अकॅडमी येथूनपोलीस भरती शिक्षण घेत, स्पर्धा परीक्षांची तयारी करत असताना अविनाश पहिल्याच प्रयत्नात यशस्वी झाला.घरात बिकट परिस्थिती असताना असे दिवस काढलेल्या अविनाश यांनी मोठ्या जिद्दीने , मेहनतीने दहावी-बारावी, बीए चे शिक्षण करून , देवळा येथील अकॅडमी येथे जीवांची बाजी लावून व्यायामात ,स्वतःला झोकून देऊन ,कधीच थकलेला चेहरा दुसऱ्याला दिसू न देता स्वतःला यशस्वी करताना बघत गेला.,

माझा या यशाचे सर्व श्रेय माझ्या आईं वडील व माझ्या मार्गदर्शक शिक्षकांना जाते.स्वंयशिस्त आणि अभ्यासाचे नियोजन चांगले असेल तर नक्कीच यश मिळते.
*-  अविनाश सोनवणे मुंबई पोलीस

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *