सावत्र भावानेच केले शिर धडापासून वेगळे

शहापूर : प्रतिनिधी 
कल्याण तालुक्यातील निलिंबी गावाच्या हद्दीमध्ये सुमारे महिनाभरापूर्वी फैजल अन्सारी (वय 29) याचे शिर धडापासून वेगळे केलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणाचा अखेर उलगडा झाला आहे.
ठाणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने या प्रकरणात फैजल याचा सावत्र भाऊ सलमान अन्सारी (वय 25) याला अटक केली आहे. संपत्तीच्या वादातून त्याने ही हत्या केल्याची कबुली पोलिसांना दिली. त्यामुळे संपत्तीच्या लालसेमुळे व्यक्ती किती टोकाला जाऊ शकते, हे या प्रकरणातून स्पष्ट होत आहे.
निलिंबी ते अंबरनाथच्या दिशेने जाणार्‍या मार्गिकेवरील जंगलामध्ये 29 मे या दिवशी एक मृतदेह ग्रामस्थांंना आढळून आला होता. या मृतदेहाचे शिर हे धडापासून वेगळे झाले होते. याप्रकरणी पोलीसपाटील संगीता शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे कल्याण तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. डी.एस. स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश मनोरे यांनी पथके तयार केली.
मृताची ओळख पटली नसल्याने पोलिसांनी राज्यातील सर्व पोलीस ठाण्यांतील हरविलेल्या व्यक्तींबाबत तक्रार दाखल आहे का, याची माहिती घेतली. तसेच मृताचे छायाचित्र विविध व्हॉट्सअ‍ॅप समूह, गाव-पाड्यात फलक चिटकवून माहिती मिळविण्यास सुरुवात केली. सीसीटीव्ही चित्रीकरणाच्या आधारेदेखील आरोपीचा शोध सुरू केला. सीसीटीव्ही चित्रीकरणामध्ये पथकाला एक मोटार त्या भागातील रस्त्यावर आढळली होती.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *