नादुरुस्त बसला विद्यार्थ्यांनाकडून दे धक्का

 

लासलगाव:समीर पठाण

लासलगाव-खेडला झुंगे या नादुरुस्त असलेल्या एसटी बसला विद्यार्थ्यांनाकडून दे धक्का मारण्याची वेळ आली.गाव-खेड्यापर्यंत जाण्यासाठी महामंडळाच्या एसटी बसशिवाय पर्याय नाही मात्र लासलगाव आगारच्या डेपोतून नादुरूस्त बस चालवत असल्याची बाब समोर आली आहे.

लासलगाव बस स्थानकातून लासलगाव-खेडला झुंगे ही एसटी बस अर्धा किलोमीटर गावांत येताच अचानक बंद पडल्याने विंचूर कोटमगाव रोडवरील त्रिफुलीवर वाहतूक कोंडी झाल्याने वाहतूक पोलिसांनी बस मधील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना धक्का मारण्यासाठी विनवणी केल्यानंतर विद्यार्थी संकटकाळी प्रवेशद्वारातून बाहेर पडत एसटीला धक्का मारत एसटी बस रस्त्याच्या कडेला नेत वाहतूक कोंडी फोडल्याने वाहतूक पोलिसाने सुटकेचा विश्वास सोडला मात्र शालेय महाविद्यालय विद्यार्थ्यांना नेहमीच बसला धक्के मारावे लागत असल्याने एसटी महामंडळाने खबरदारी म्हणून चांगल्या बसेस द्याव्या अशी मागणी केली जात आहे

आशिया खंडात कांद्यांची बाजारपेठ म्हणुन नावलौकीक असलेली बाजारपेठ लासलगांव आहे. देशाच्या विविध भागातुन व्यापारी व संबधित असणारे यांची वर्षभर ये-जा चालुच असते.लासलगांव हे चांदवड,मनमाड,येवला,कोपरगांव,नासिक,पिंपळगाव, निफाड या सारख्या मोठ्या व्यापारी तालुक्यांना जोडणारा महत्वाचा दुवा आहे.परंतु एसटी महामंडळाच्या ढिसाळ नियोजनामुळे विनाकारण विद्यार्थ्यांनसह प्रवाश्यांना त्रास सहन करावा लागत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *