गांधीनगर लष्करी तळावर युद्धभूमीचा थरार

कॉम्बॅक्ट आर्मी एव्हिएशनच्या 39 व्या तुकडीचा दीक्षांत सोहळा

 

37 अधिकारी हवाई दलात दाखल

21 वैमानिकांना एव्हिएशन विंग

नाशिक : प्रतिनिधी

चित्ता, चेतक, ध्रुव या लढाऊ हेलिकॉप्टर्सच्या माध्यमातून जवानांनी केलेल्या चित्तथरारक कसरतींमुळे गांधीनगर लष्करी तळावर युद्धभूमीचा थरार अनुभवायला मिळाला.

नितेश पांडे यांचे हृदयविकाराने निधन

कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलच्या लढाऊ वैमानिकांच्या दीक्षांत सोहळा काल पार पडला. लेफ्टनंट जनरल अजय कुमार सुरी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या सोहळ्यात कठोर प्रशिक्षणानंतर एकूण 37 अधिकारी कॉम्बॅट एव्हिएटर्स म्हणून नवीन भूमिका साकारण्यासाठी तयार झाले आहेत. कॉम्बॅट एव्हिएटर्स कोर्स यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर 21 अधिकार्‍यांना कॉम्बॅट हेलिकॉप्टर पायलट बनण्यासाठी एव्हिएशन विंग्स सुरी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले ट्रॉफी विजेत्यांपैकी. कॅप्टन जी वी पी प्रत्युष यांना कॉम्बॅट एव्हिएटर्स कोर्स क्रमांक 39च्या संपूर्ण क्रमवारीत प्रथम स्थान मिळाल्याबद्दल सिल्व्हर चीता ट्रॉफी देण्यात आली. मेजर हर्षित मल्होत्रा यांना मेजर प्रदीप अग्रवाल ट्रॉफी देण्यात आली.सर्वोत्कृष्ट आर्मी हेलिकॉप्टर इन्स्ट्रक्टर कोर्स क्रमांक 38, मेजर प्रणीत कुमार यांना ग्राउंड विषयातील सर्वोत्कृष्ट ट्रॉफी आणि मेजर विवेक कुमार सिंग यांना बेसिक रिमोटली पायलेटेड सिस्टीम कोर्ससाठी फर्स्ट इन ऑर्डर ऑफ मेरिट ट्रॉफी देण्यात आली. मेजर पल्लव वैशंपायन यांना ग्राउंड विषयातील सर्वोत्कृष्ट आणि लेफ्टनंट कमांडर अनिल कुमार यादव यांना फ्लाइंग प्रशिक्षक साठी फर्स्ट इन ऑर्डर ऑफ मेरिट ट्रॉफी देण्यात आली.युद्धाच्या वेळी महत्वाची साथ देणार्‍या लढाऊ हेलिकॉप्टर वैमानिकांची तुकडी देशाच्या संरक्षणासाठी सज्ज झाली आहे. गांधीनगर येथील कॉम्बॅक्ट आर्मी एव्हिएशन स्कूलमध्ये हेलिकॉप्टर वैमानिकांचे प्रशिक्षण दिले जाते.

त्र्यंबकेश्‍वरच्या मंदिरात धूप दाखविण्याची कोणतीच परंपरा नाही :महाआरतीनंतर आ. नितेश राणे यांचा दावा

प्रशिक्षण कालावधित त्यांच्याकडून संपूर्ण तयारी करुन घेतली जाते. यामध्ये शत्रुंवर हवाई हल्ला करणे, जमिनीवरील सैन्याला रसद पुरविणे, जखमीना सुरक्षित ठिकाणी उपचार्थ हलविणे आदीसह विविध बाबींचे सखोल ज्ञान दिले जाते.

यावेळी लष्करी थाटात मान्यवरांच्या हस्ते 21 वैमानिकांना एव्हिएशन विंग व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी आपल्या पाल्याचे कौतुक पाहण्यासाठी पालकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली होती.

हवाई दलाच्या चित्तथरारक कसरती
दरम्यान दीक्षांत संचलनानंतर प्रांगणात हवाई दलाच्या चित्ता, चेतक, ध्रुव या हेलिकॉप्टर चमूने चित्तथरारक कसरती सादर करत उपस्थितांना खिळवून ठेवले.

कपडे धुण्यासाठी गेलेल्या विवाहितेवर बलात्कार करुन निर्घृण खून

हवेत करण्यात आलेल्या कसरतींनी उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. अतिशय चित्तथरारक कसरती सादर करत हवाई दलातील चमूने उपस्थितांची मने जिंकली. हेलिकॉप्टरमधून युद्धभूमीवर दाखल होत शत्रूच्या छावण्यांवर हल्ला चढविणे, जखमी सैनिकांना एअर लिफ्ट करणे, एकाचवेळी चार चार हेलिकॉप्टरवर हल्ला करून जाणे, अशी हृदयाचा ठोका चुकवणारी प्रात्यक्षिके सादर झाली.

वावी जवळ शिवशाही बस चालकाची बसमध्येच आत्महत्या

प्रत्येक वैमानिकाच्या डीएनएमध्ये तंत्रज्ञान : अजय सुरी
तंत्रज्ञान हे प्रत्येक वैमानिकाच्या डीएनएमध्ये असते आणि मला खात्री आहे की आजचा वैमानिक त्याला खुल्या हातांनी स्वीकारेल, जेणेकरून उद्याच्या युद्धक्षेत्रात टिकून राहता येईल.

भविष्यात अजून चार एव्हिएशन ब्रिगेड स्थापन करण्यात येणार आहे. मी एव्हिएटर आणि आर पी एस क्रू यांना एकात्मिक थिएटर घटकाचा भाग म्हणून अविभाज्य एकात्मिक ऑपरेशन्स आणि मल्टी डोमेन ऑपरेशन्सचे समर्थक म्हणून पाहतो.संकल्पना हा आर्मचा नवीन फोकस असावा. सपोर्टिंग प्रशिक्षण सिद्धांतासोबत ऑपरेशन्सच्या संकल्पनेचे संरेखन करणे ही आजची गरज आहे. निश्चितच, अधिक मानवयुक्त प्लॅटफॉर्म मानवरहितमध्ये रूपांतरित होत आहेत. मानवरहित संघा सारखी संकल्पना एक वास्तविकता असेल जिथे सैन्य विमानचालनाच्या सर्व लढाऊ आणि लढाऊ समर्थन आणि नि:शस्त्र ड्रोनद्वारे वाढवल्या जातील. असे आर्मी एव्हिएशनचे महासंचालक लेफ्टनंट जनरल अजय कुमार सुरी यांनी सांगितले.

 

आयकॉनिक Aक-64ऊ. बोईंग इंडस्ट्रीजद्वारे उत्पादित केलेले अपाचे अटॅक हेलिकॉप्टर आर्मी एव्हिएशनमध्ये समाविष्ट केले जात आहे. इंडक्शन प्रक्रिया सुरू झाली आहे आणि 2024 मध्ये युनिट उभारले जाण्याची शक्यता आहे, निश्चितपणे, सामरिक लढाई क्षेत्रात एक गेम चेंजर ठरणार आहे.

पाहा व्हीडिओ

फील्ड फॉर्मेशन्ससाठी उपलब्ध असलेल्या सर्व विमान संपत्तीचे एकत्रीकरण सुनिश्चित करण्यासाठी एव्हिएशन ब्रिगेड्सची स्थापना करण्यात आली आहे. यामुळे आर्मी एव्हिएशन ऍसेट्सच्या रोजगारात नवीन आयाम जोडला गेला आहे, असेही लेफ्टनंट जनरल अजय कुमार सुरी म्हणाले.

कर्जाला कंटाळून शेतक-याची शेततळ्यात आत्महत्या

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *