नाशिक

‘झाले इलेक्शन, जपा रिलेशन’चा ट्रेंड हद्दपार

‘गरज सरो वैद्य मरो’ची अनुभूती; नगरसेवक फोन उचलेना

नाशिक : प्रतिनिधी
नाशिक महापालिकेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या, पण निवडणुकांनंतरचे राजकीय वास्तव मात्र धक्कादायक आहे. वर्षानुवर्षे जपले गेलेले ’झाले इलेक्शन, जपा रिलेशन’ हे तत्त्व जणू इतिहासजमा झाले आहे. त्याऐवजी आता ’गरज सरो आणि वैद्य मरो’, अशीच स्थिती दिसून येते.
निवडणूक काळात एकमेकांच्या जीवावर उठणारे, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडणारे, एकमेकांकडे न पाहणारे उमेदवार निकालानंतर मात्र चहापान, मनोमिलन, भेटीगाठी यांमधून सगळे विसरून पुढे जात असत. हार-जित असो, नातेसंबंध जपणे हीच खरी राजकारणाची परंपरा होती. मतदारांचे आभार मानण्यासाठी मिरवणुका, कार्यकर्त्यांना सन्मान, भेटीगाठी असा उत्साह पाहायला मिळायचा. मात्र, यंदाचे चित्र वेगळेच आहे.
निवडून आलेल्या नगरसेवकांना फोन केला तर कॉल उचलला जात नाही, कधी थेट कट केला जातो. निवडणुकीत जीव ओतून काम करणार्‍या कार्यकर्त्यांनाही आज गरज सरो वैद्य मरोचा अनुभव येत आहे. कार्यकर्त्यांच्या जीवावर निवडून आलेले नगरसेवक मोठ्या उन्मादात वागत असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. सोशल मीडियावरही हा उन्माद स्पष्टपणे दिसतो आहे. मुंबई महापालिकेच्या निकालानंतर नितेश राणे यांनी टाकलेला छद्मी हसतानाचा व्हिडीओ, ठाकरे गटाच्या पराभवावर केलेली उन्मादात्मक पोस्ट यावरून राजकारण किती सूडाचे झाले आहे, हे अधोरेखित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आनंद साजरा करा, पण तो उन्माद वाटेल असे व्यक्त होऊ नका, अशी समज देऊनही कार्यकर्त्यांच्या भावना दुखावणार्‍या पोस्ट थांबत नाहीत. नाशिकमध्येही याचे गंभीर परिणाम दिसू लागले आहेत. सोमवार पेठेतील शिवसेना उमेदवार गणेश मोरे यांच्या घरासमोर अज्ञातांनी फटाके फोडून शिवीगाळ केली. जेलरोड परिसरात एका उमेदवाराला मारहाण झाली. कुणी हरले म्हणून त्याच्या घरासमोर फटाके, कुठे धमक्या, कुठे हाणामारी हे चित्र लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे. निवडणूक संपली तरी वैर संपलेले नाही, उलट ते अधिक तीव्र झाले आहे. असंतोष, असूया आणि सूडाचे राजकारण एखाद्याच्या मृत्यूचेही कारण बनू शकते, अशी भीती व्यक्त होत आहे. झाले इलेक्शन, जपा रिलेशन हा विचार पुन्हा जिवंत करण्याची गरज असताना, राजकारण अधिकच कटू होत चालले आहे.

The trend of ‘elections done, Japa Relation’ has been banished

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

6 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

6 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

6 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

6 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

6 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

6 hours ago