कार हवेत उडाली अन थेट कांदा चाळीच्या छतावर जाऊन  पडली

अनियंत्रित कार हवेत उडाली अन
थेट कांदा चाळीच्या छतावर जाऊन  पडली
सिन्नर : प्रतिनिधी
सिन्नरहून भरधाव वेगात ठाणगावकडे निघालेल्या कार मधील चालकाचा ताबा सुटल्याने ती अनियंत्रित होऊन रस्त्याकडेला असलेल्या एका टेकडावरुन उडून बाभळीच्या झाडावर आदळली. तेथून उडून ती थेट रस्त्यापासून २० फुट अंतरावर असलेल्या कांदा चाळीवर जाऊन पडली, ही घटना बुधवारी (दि.१२) दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास घडली. आटकवडे – डुबेरे शिवारात झालेल्या या भीषण अपघातात चालकासह अन्य एक जण गंभीर जखमी झाला आहे. केवळ दैव बलवत्तर म्हणून दोघांचा जीव वाचला.
या अपघातात विवेक विठ्ठल माळी (३०), रा. दोडी आणि रामदास काशिनाथ हडगुंडे (४४) रा. दापूर ता. सिन्नर हे दोघे जखमी झाले आहेत. त्यात माळी यांच्या डोक्याला आणि गालाला जबर मार लागल्याने त्यांच्यावर सिन्नर येथील खाजगी रुग्णालयात उपचार करून पुढील उपचारासाठी एसएमबीटी रुग्णालयात हलवण्यात आले. रामदास हळकुंडे आणि विवेक माळी हे दोघे दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास ह्युंडाई कार (एमएच – १५, जेसी – ९४२७) ने सिन्नरहून डुबेरेच्या दिशेने जात होते. भरधाव वेगात असलेली कार रस्त्याच्या कडेला असलेल्या एका उंचवट्यावरुन उडून ती रस्त्या कडेला असलेल्या बाभळीच्या झाडावर आदळली. कारचा वेग जोरात असल्याने छत झाडाला घासून तेथून ती थेट रस्त्यापासून २० फूट अंतरावर असलेल्या कृष्णा बाळू वाघ (२३) रा. आटकवडे यांच्या कांदा चाळीवर जाऊन पलटी झाली. दरम्यान, पत्र्याच्या कांदा चाळीवर कार आदळल्यानंतर मोठा आवाज झाल्याने स्थानिक रहिवाशांनी घटनास्थळी धाव घेतली. कांदा चाळीवर चढून गाडीतील दोघा जखमींना सुरक्षित रित्या बाहेर काढत उपचारासाठी तत्काळ सिन्नर येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले.
वाघ कुटुंबीयांचे दैव बलवत्तर
कांदा चाळीच्या शेजारी कृष्णा वाघ यांचे राहते घर आहे. या कांदा चाळीत वाघ कुटुंबीय गाई बांधतात. सुदैवाने बुधवारी या चाळीतील गाई दुसरीकडे बांधल्या होत्या. त्यामुळे कुठलीही जीवित हानी झाली नाही. या संदर्भात कृष्णा वाघ यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिल्यानंतर पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी घटनास्थळी भेट दिली.
Bhagwat Udavant

Recent Posts

चौदाव्या मजल्यावरून पडल्याने बांधकाम कामगाराचा मृत्यू

सिडको: विशेष प्रतिनिधी मुंबई नाका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गोविंद नगर परिसरात सुरू असलेल्या एका इमारतीच्या…

3 days ago

मनमाडला गजानन महाराज प्रकट दिन सोहळा उत्साहात

मनमाडला गजानन महाराज प्रकट दिन सोहळा उत्साहात   मनमाड (प्रतिनिधी) :- शेगावचे गजानन महाराज यांचा…

3 days ago

जिल्हा न्यायालयाबाहेर फ्री स्टाइल

जिल्हा न्यायालयाबाहेर फ्री स्टाइल नणंद भावजयींनी झिंज्या उपटल्या सिडको  : विशेष प्रतिनिधी पतीच्या निधनानंतर पत्नीने…

3 days ago

पर्यटनातून ‘परमार्थ’

व्यक्ती विशेष देवयानी सोनार पर्यटनातून ‘परमार्थ’       लोकांना पर्यटन, तीर्थयात्रा घडविण्यासह इतरांना ज्याच्यातून…

4 days ago

नाशिकरोडला युवकाचा खून

नाशिक: प्रतिनिधी नाशिकरोड येथे एका युवकाचा दगड टाकून तसेच धारदार हत्याराने वार करून निर्घृणपणे खून…

4 days ago

कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंना 2 वर्षांची शिक्षा, नेमके काय आहे प्रकरण

कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंना 2 वर्षांची शिक्षा नाशिक: प्रतिनिधी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना न्यायालयाने मोठा…

4 days ago