नाशिक

युद्धामुळे सिंचन साहित्याचे दर कडाडले

शेतकर्‍यांचे आर्थिक गणित बिघडले; 30 ते 40 टक्के वाढ

लासलगाव : वार्ताहर
इराण आणि इस्त्रायल-अमेरिका यांच्यात सुरू असलेला संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत आहे. त्याचा परिणाम आता जागतिक अर्थव्यवस्थेसह विविध क्षेत्रांवर दिसू लागला आहे. आखाती प्रदेशातील या तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आहेत आणि त्याचा थेट फटका शेती क्षेत्रालाही बसू लागला आहे. विशेषतः सिंचनासाठी लागणार्‍या साहित्यांच्या किमतीत मोठी वाढ झाली असून, शेतकर्‍यांचे आर्थिक गणित बिघडले आहे.
कच्चे तेल शुद्धीकरण प्रक्रियेतून मिळणार्‍या काही घटकांपासून सिंचनासाठी वापरले जाणारे पीव्हीसी पाइप, ठिबक आणि तुषार सिंचन साहित्य तयार केले जाते. सध्या कच्च्या मालाच्या पुरवठ्यात अडचणी निर्माण झाल्यामुळे या साहित्यांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. तुषार सिंचन संच, ठिबक सिंचन यंत्रणा, पीव्हीसी पाइप, मोटारपंप तसेच मोटारपंपासाठी लागणार्‍या केबल्स यांच्या किमतीत सुमारे 35 ते 40 टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याचे व्यापार्‍यांकडून सांगितले जात आहे.
उन्हाळी हंगामासाठी अनेक शेतकरी आधीच सिंचनाची तयारी करत असतात. मात्र अचानक झालेल्या दरवाढीमुळे शेतकर्‍यांचे नियोजन विस्कळीत झाले आहे. सिंचन साहित्य खरेदी करताना शेतकर्‍यांना आता अतिरिक्त 15 ते 20 हजार रुपयांचा खर्च करावा लागत आहे. त्यामुळे उत्पादन खर्च वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

सिंचन साहित्याच्या किमतीत मोठी वाढ

तुषार सिंचन संचाचा दर पूर्वी सुमारे 32 हजार 700 रुपये होता. आता त्याची किंमत वाढून सुमारे 44 हजार रुपये झाली. ठिबक सिंचनासाठी एकरी पूर्वी सुमारे 40 हजार रुपये खर्च येत होता. आता तो खर्च वाढून सुमारे 60 हजारांपर्यंत पोहोचला. पीव्हीसी पाइपच्या किमतीतही मोठी वाढ झाली आहे. 75 एमएम पाइपचा दर पूर्वी 460 रुपये होता, तो आता वाढून 620 रुपये झाला आहे. 90 एमएम पाइपची किंमत 540 रुपयांवरून थेट 860 रुपयांपर्यंत पोहोचली आहे. मोटार पंपासाठी लागणार्‍या केबलच्या किमतीत तर सर्वाधिक वाढ झाली आहे. पूर्वी मीटरमागे सुमारे 90 रुपये असलेली केबल आता 165 रुपयांपर्यंत पोहोचली. मोटारपंपाच्या किमतीतही वाढ दिसून येत आहे. 5 एचपी मोटारपंपाचा दर पूर्वी सुमारे 22 हजार 500 रुपये होता, तो आता 24 हजार 500 रुपयांपर्यंत वाढला आहे. तसेच 7.5 एचपी मोटार पंपाची किंमत 31 हजार रुपयांवरून 34 हजार 200 रुपयांपर्यंत पोहोचली.

The war caused a sharp increase in the prices of irrigation materials.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

5 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

5 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

5 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

5 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

5 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

5 hours ago