नाशिक

कृतार्थ भाव घेऊन घराच्या ओढीने वारकरी परतले

मिळेल त्या साधनाने प्रवास; वाहनतळ रस्ता खुला करण्याचा निर्णय योग्य

त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी
पंधरा दिवसांपासून संत निवृत्तिनाथ यात्रा पौषवारीसाठी घराबाहेर पडलेला वारकरी नाथांच्या समाधीवर माथा टेकवून कृतार्थ झाला. ब्रह्मगिरीच्या दर्शनाने आणि गोदामायीच्या स्नानाने पावन होऊन आनंदित झालेला वारकरी आता घराच्या ओढीने माघारी फिरला आहे. एकादशीच्या रात्री त्र्यंबकनगरीत हरिनामाचा जागर करत सकाळी द्वादशीला काल्याचा प्रसाद घेऊन परत फिरताना त्याचे डोळे पाणावले. आता आपली भेट पुढच्या वर्षी, असे म्हणत वारकरी एकमेकांची गळाभेट घेत पुन्हा एकदा ब्रह्मगिरीला हात जोडत प्रवासाला लागले आहेत.

पायी दिंडीसोबत असलेला रथ आता प्रवासाचे साधन झाला आहे. बसने प्रवासाला प्रचंड गर्दी झाली होती. साहित्यासाठी सोबत आणलेल्या पिकअप, ट्रॅक्टर यांसारख्या वाहनाने थेट गावी पोहोचण्याची सोय होत असेल तर त्या वाहनांनी अन्यथा बसने प्रवास होत आहे.
परतीच्या वाहतूक नियोजनासाठी वाहनतळाचा रस्ता खुला करण्याचा निर्णय प्रांताधिकारी जी.एस.टी. पवन दत्ता, तहसीलदार गणेश जाधव यांनी यात्रेचे पूर्वनियोजन करताना घेतला होता. त्याचा योग्य परिणाम यात्रेदरम्यान आणि यात्रा आटोपताना अनुभवास आला आहे. सीएनजी बसस्थानक ते वाहनतळ आणि तेथून पुढे खंडेराव मंदिर परिसराला जोडणारा रस्ता मागच्या अनेक वर्षांपासून दगड टाकून बंद ठेवला होता. वास्तविक पाहता, बाहेरच्या वाहनांना थेट संत निवृत्तिनाथ मंदिर परिसराकडे जाण्यासाठी सोयीचा आणि 53 वर्षांपूर्वी तयार झालेल्या डीपीमधील हा रस्ता आहे.
गुरुवारी परतीचा प्रवास सुरू झाला तेव्हा संत निवृत्तिनाथ मंदिर आणि शहराच्या एका भागातील वाहने बाहेर पडताना जिल्हा परिषद शाळेसमोरचा रस्ता न वापरता या रस्त्याने वळवण्यात आली. त्यामुळे नगरपरिषद ते जिल्हा परिषद शाळा आणि नूतन त्र्यंबक विद्यालय या गर्दीच्या रस्त्यावर निर्माण होणारी वाहतुकीची समस्या टळलेली पाहावयास मिळाली. दिंडीसोबत असलेली वाहने कमी वेळात शहराच्या बाहेर पडली. यासाठी प्रांताधिकारी पवन दत्ता, तहसीलदार जाधव पाटील, नायब तहसीलदार राजेंद्र पवार यांच्यासह महसूलची सर्व टीम यांना श्रेय द्यायला हवे. प्रांताधिकारी, तहसीलदार, मंडल अधिकारी, तलाठी अशी टीम हातात काठी घेऊन रहदारीसाठी मार्ग मोकळा करण्यासाठी झटत होती.

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

7 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

8 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

8 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

8 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

8 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

8 hours ago