निफाड। प्रतिनिधी
निफाड तालुक्यातील शिवडी येथुन रानवड साखर कारखान्यावरील के के वाघ कनिष्ठ महाविद्यालयात ११ वीत शिकणारी
तन्वी विजय गायकवाड ही सोमवारी सकाळी काँलेजला जात असतांना ऊगाव खेडे दरम्यान असलेल्या विनता नदिच्या पुलावरुन जात असतांना मोठ्या प्रमाणात असलेल्या पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने स्कुटी सह वाहून गेली. तिचा मृतदेह नदीप्रवाहात वाहत जाऊन असलेल्या संत जनार्दन आश्रमशाळेजवळ सापडला निफाड येथे उपजिल्हा रुग्णालयात तपासणी केल्यावर तिस मृत घोषित करण्यात आले निफाड तालुक्यातील रुई येथिल विजय गायकवाड यांची ती कन्या होती शिक्षणासाठी शिवडी येथे मामांकडे राहुन काँलेजला जात येत होती