नाशिक : बंद घरातुन चोरट्यानी   12 ते 17 मार्च दरम्यान आंबेडकर नगर मनपा बिल्डींग नंबर 1 दुसरा मजल्यावरील रूम नंबर 35 मधून 14 हजार 400 रुपयांचा ऐवज चोरुन नेला आहे.यात तीन हंडे, तीन कळश्या , अर्धा ग्रॅम सोन्याचे कानातले, पितळी डब्यातील चिल्लर, चांदीचे नाने असे ऐवज चोरीस गेला आहे .याप्रकरणी संजय हरीश बाबरीया (वय ३८ हनुमान वाडी पंचवटी ) यांनी सरकार वाडा पोलिसात  फिर्याद दिली. पुढील तपास पोना महाले करत आहेत.
——-
रुग्णावर उपचार न केल्याने
व्यवस्थापकास मारहाण
नाशिक : म्हसरूळ परिसरातील लिलावती रुग्णालयात व्यवस्थापक म्हणून काम पाहणाऱ्या सौरभ अरुण विभाडीक (वय 24)  डॉक्टरच्या मुलास  बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना शुक्रवारी (दि १७)  घडली.
यातील सशयित 1) विजय धात्रक 2) ओंकार जाधव 3) भैया शिराळ रा.  इतर 3 साथीदार नाव पत्ता माहित नाही.
एकत्र येवून त्यांचा रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णावर प्राथमिक उपचार केले असताना देखील औषधोपचार करण्यास उशीर होत असल्याचे कारणावरून वाईट साईट शिवीगाळ करून तुम्ही विजयवर उपचार करायला उशीर का करत आहात, त्याला काही झाले तर तुम्हाला सोडणार नाही असा दम देवून, हॉस्पीटलमध्ये इतर डॉक्टर वैद्यकिय सेवा बजावत असताना फिर्यादी  यांचा मुलगा यास लाथाबुक्क्यांनी मारहाण करून गंभीर जखमी करून, नाकाचे हाड फ्रॅक्चर करून रिक्षा क्र. एम. एच-15- एफ. यु-4258 हिचेत बसुन निघुन गेले.
याप्रकरणी म्हसरूल पोलिसात
अरूण सोमनाथ विभांडीक, (वय 58, रा. लिला स्मृती रिलायन्स पेट्रोल पंपाचे मागे, दिंडोरी रोड) यांनी फिर्याद दिली. सदर घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून पोलीस संशयितांचा शोध घेत आहेत. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक वाघ करत आहेत.
——
एक अल्पवयीन सह दोन युवती बेपत्ता बेपत्ता
नाशिक : शहर परिसरातून एक अल्पवयीन व दोन युवती  बेपत्ता झाल्या आहेत. पहिली घटना मुबई नाका पोलिस ठाण्यात हद्दीत घडली आहे.  फिर्यादी यांची अल्पवयीन मुलीस संशयित जाफर शेख अब्दुल्ला (वय १९ काझीपुरा) याने सदर मुलीस कॉलेजला जात असताना फुस लावून पळवून नेले. फिर्यादी याना फोन वर शिवीगाळ व दमदाटी केली. याप्रकरणी मुबई नाका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील  तपास पोउनि शेळके करत आहेत.
दुसरी घटना दूध पिशवी आणण्यासाठी पाठवली असता. संशयित दत्तू गणेश बर्डे (वय २० दसक गाव नारोड) यांच्या दुचाकी वरून गेली असल्याची फिर्याद मुलीच्या आईने उपनगर पोलिसात दिली. पुढील तपास पोउनि गोळे करत आहेत.
इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील  पाथर्डी गाव  गौतम किराणा दुकान सुखदेव नगर  येथून फिर्यादी याच्या मुलीस अज्ञात इसमाने कशाचे तरी आमिष दाखवून पळवून नेले. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसात फिर्यादी मुलीच्या वडिलांनी फिर्याद दिली. पुढील तपास सपोनि सययद करत आहेत
——
दोन दुचाकी चोरीस
नाशिक : शहर परिसरातून २ दुचाकी चोरी झाल्या आहेत. पहिली घटना नाशिक रोड परिसरात पार्क केलेली . दुचाकी क्र एम एच 15 डीजे 5816 अज्ञात चोरट्याने 16 ते 17 तारखे दरम्यान चोरीस गेली. या प्रकरणी दीपक निरभवणे (वय ३८ रा अस्वले मळा , एकलहरा नारोड) यांनी फिर्याद दिली. पुढील तपास पोना घेगडमल करत आहेत.
दुसरी घटना अनिकेत अपार्टमेंट गुलमोहर विहार कॉलनी पाइप लाइन रोड गंगापूर येथे पार्क केलेली. दुचाकी क्र एम एच १५ एच वाय 2956 अज्ञात चोरट्याने चोरून नेली नेली. याप्रकरणी ऋषीप्रसाद शांताराम वाघ (फ्लॅट ८ विसे चौक गंगापूर) यांनी सातपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली पुढील तपास पोहवा पाटील करत आहेत.
—–
डोक्यास मारहाण
नाशिक :  हेमंत एकनाथ मोकळं (वय ५५ लोकमान्य नगर पवन नगर नाशिक ) यांच्या मुलास डोक्यावर काही तरी हत्याराने संशयित निलेश कुमावत, भूषण गोलाईत यांनी मारहाण केली. अंबड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात  आला. पुढील तपास सपोनि राजपूत करत आहेत.
Team Gavkari

Recent Posts

दादांची अकाली एक्झिट ! जिल्हा शोकसागरात

सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…

9 hours ago

स्मार्ट पार्किंगचे घोडे अडलेलेच!

टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…

9 hours ago

बांगलादेश क्रिकेट बोर्डाचा आत्मघातकी निर्णय

बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्‍या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…

9 hours ago

अजितदादांची साथ नेहमी स्मरणात राहील!

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…

9 hours ago

पवार परिवारावर आघात

महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…

10 hours ago

मीठसागरे शिवारात बिबट्या मादी जेरबंद

सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…

10 hours ago