लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असणाऱ्या श्री मतोबा महाराजांच्या मुर्तीची व दान पेटीची चोरी..
निफाड : विशेष प्रतिनिधी
लाखो भाविकांचे श्रध्दास्थान व नैताळे कराचे अराद्य दैवत श्री मतोबा महाराज यांच्या मंदीरातुन चांदीच्या तीन किलो वजनाच्या दोन मुर्तीची व दान पेटीची रात्री दोन वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यानी चोरी केली असुन या घटनेमुळे ग्रामस्थामध्ये तिव्र संताप व्यक्त होत असुन जो पर्यंत पोलिस चोरट्याना शोधून कडक शाशन करत नाही तो पर्यंत संपुर्ण नैताळे शहर स्वयम् स्फुर्तीने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे दरम्यान निफाड पोलिसानी घटनास्थळी भेट देऊन चोरीची संपुर्ण माहिती घेतली आहे व तपासाची पुढील कार्यवाई सुरु केली आहे पोलिस निरिक्षक गणेश गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची पुढील दिशा ठरवली जात आहे लवकरच श्वान पथकाला पाचारण केले जात असल्याचे सांगण्यात आले आहे.