आईच्या दशक्रियेला गेला अन…
लासलगाव : प्रतिनिधी
आईच्या वियोगाच्या दु:खात असतानाच दशक्रियेसाठी सगळे कुटुंब परगावी गेले. आणि इकडे घर बंद असल्याची संधी साधत चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप तोडून 68 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून लंपास केल्याची घटना घडली.या घरफोडीत 38 हजार 500 रुपयांचे सोन्याचे दागिने तर रोख 30 हजार रुपये चोरून अज्ञात चोरट्यानी पोबारा केला.या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी भाऊसाहेब रुंजा पवार राहणार मरळगोई,हल्ली मुक्काम किल्ल्याच्या पाठीमागे,लासलगाव हे घराला कुलूप लावून त्यांच्या आईचा दशक्रिया विधी करण्यासाठी कुटुंबासह मरळगोई येथे गेले असता अज्ञात चोरट्यांनी गुरुवारी मध्यरात्री दोन वाजेच्या दरम्यान घराचा कडीकोंडा तोडून घरात प्रवेश केला व घरातील शोकेस चे लॉकर तोडून 30 हजार रुपये रोख तसेच 11 हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी,5 हजार 500 रुपये किमतीचे सोन्याचे झुमके,5 हजार 500 रुपये किमतीचे वेल व लटकन,16 हजार 500 रुपये किमतीचे सोन्याचे मणी मंगळसूत्र असलेली पोत असा एकुन 68 हजार 500 रूपयांचा ऐवज चोरून पोबारा केला.
या घटनेची माहिती मिळताच लासलगाव पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक राहुल वाघ हे पोलीस कर्मचार्यांसह घटनास्थळी दाखल झाले व आजूबाजूला असलेल्या सी सी टी व्ही आधारे तपासकार्य सुरू केले.या प्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहायक उपनिरीक्षक सुराशे करत आहे.
खा. वाजे : शिवसेना कार्यालयात मनसे पदाधिकार्यांची उपस्थिती नाशिक : प्रतिनिधी सरकारला हिंदीसक्तीचा निर्णय मागे…
धरण समूहात 47 टक्के; गंगापूर धरणात 56 टक्के पाणीसाठा नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यात गेला महिनाभर…
चेन खेचल्याने वीस दिवसांत 98 गाड्यांना विलंब नाशिकरोड : प्रतिनिधी रेल्वेची विनाकारण चेन ओढण्यामुळे 1…
सध्या सुरू असलेल्या पहिलीपासूनच्या त्रिभाषा सूत्रासंदर्भात आपण सर्व मराठी बांधवांनी जाणून घ्यायला हवे आपल्या मराठी…
पारोळा : एका अनोळखी महिलेच्या डोक्यात दगड टाकून हत्या करण्यात आली होती. यानंतर महिलेचा मृतदेह…
अभोणा ग्रामपालिकेचे दुर्लक्ष, कचरा डेपोसाठी जागा नसल्याचा जावईशोध अभोणा : प्रतिनिधी देशभर स्वच्छ भारत मिशनचा…