नाशिक

नेत्यांच्या मागे फिरणार्‍यांना तिकिटे नाहीत

ना.बावनकुळे : भाजपा उत्तर महाराष्ट्र मेळावा

नाशिक : प्रतिनिधी
केवळ नेत्यांच्या मागे फिरणार्‍यांना महापालिका निवडणुकीत तिकीट मिळणार नाही, नेत्यांपुढे चमकोगिरी करू नका. कामे करा, जनतेत जाऊन महायुती सरकारच्या चांगल्या योजना जनतेपर्यंत पोहोचवा, अशा सूचना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्या.
नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात भाजप सरकारने घेतलेले निर्णय आणि केलेल्या विकासाच्या कामांची माहिती देण्यासाठी भाजपातर्फे काल उत्तर महाराष्ट्रातील भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, संघटक यांच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री राधाकृष्ण विखे, गिरीश महाजन, जयकुमार रावळ, विजय चौधरी, प्रा. राम शिंदे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गेल्या 11 वर्षांत मोदी सरकारने केलेल्या कामांची उजळणी करून ती कामे जनतेपर्यंत पोहोचवायची आहेत. आगामी निवडणुकीत एक-एक मत महत्त्वाचे आहे. कमळ चिन्हावर लढणार्‍याला एकाही कार्यकर्त्याला निवडणूक हरू द्यायची नाही, हा संकल्प आम्ही घेतला आहे. विधानसभा निवडणुकांपूर्वी लाडकी बहीण, शेतकरी वीजबिल माफ हे निर्णय महायुती सरकारने घेतले होते. आता, स्थानिक स्वराज संस्था निवडणूक लागेलच, त्यासाठी सर्वांनी तयारीला लागण्याच्या सूचना दिल्या. पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ऑपरेशन सिंदूर राबवत ‘सिंदूर’चा बदला घेतला, तो दुसर्‍या सरकारनं घेतला नसता, असेही यावेळी
बावनकुळेंनी म्हटले.

गिरीश महाजनांकडून शंभर प्लसचा नारा

नाशिक महापालिका निवडणुकांसाठी भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी 100 प्लसचा नारा दिला आहे. महापालिका निवडणुकांसाठी युती झाली तर ठीक, नाहीतर स्वबळावर निवडणुका लढवण्याचा नारा महाजन यांनी पक्षाच्या मेळाव्यात दिला आहे. गटबाजी थांबून महापालिका निवडणुकांसाठी कामाला लागा, अशा सूचनाही पदाधिकारी व कार्यकर्त्यांना करण्यात आल्या आहेत.

महाजनांचा ‘पालकमंत्री’ उल्लेख
भाजपाच्या या मेळाव्यात सूत्रसंचालकांकडून गिरीश महाजन यांचा उल्लेख ‘संभाव्य पालकमंत्री’ म्हणून करण्यात आल्याने काहींच्या भुवया उंचावल्याचे पाहायला मिळाले.

 

Editorial Team

Recent Posts

फरार भूषण लोंढेच्या मुसक्या आवळल्या

फरार भूषण लोंढेच्या मुसक्या आवळल्या त्याच्यासह सहकार्‍याला नेपाळ सीमेजवळून अटक सिडको : विशेष प्रतिनिधी सातपूर…

16 hours ago

थेटाळेजवळ वाहनाच्या धडकेने तरुणाचा मृत्यू

लासलगाव : वार्ताहर निफाड तालुक्यातील थेटाळे शिवारात मंगळवारी दुपारी 2.30 च्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत…

18 hours ago

वृक्षतोड साधूंसाठी की संधिसाधूंसाठी?

हवेची शुद्धता राखण्यासाठी 33 टक्के वृक्ष, झाडी आणि बगीचा असणे गरजेचे आहे, पण झाडांची संख्या…

20 hours ago

सिन्नर नगरपरिषदेसाठी सरासरी 67.65 टक्के मतदान

मतदान यंत्रात किरकोळ तांत्रिक बिघाड; धक्काबुक्की, शाब्दिक बाचाबाची आणि तणावाचे वातावरण सिन्नर : प्रतिनिधी सिन्नरला…

20 hours ago

नाशिक जिल्ह्याची ओळख आता ‘बिबट्यांची पंढरी’?

देवगाव, रुई, गोंदेगाव, मरळगोई परिसरात बिबट्यांचा वाढता वावर लासलगाव : वार्ताहर द्राक्ष उत्पादनामुळे जागतिक ओळख…

21 hours ago

रासायनिक खतांच्या दरात पुन्हा वाढ

शेतकरी मेटाकुटीस; गोणीमागे 200 ते 250 रुपये अधिक मोजावे लागणार लासलगाव : वार्ताहर गेल्या काही…

21 hours ago