नाशिक

निवडणुकांचा पत्ता नाही

बॅनरवरच झळकताहेत भावी नगरसेवक!

नाशिक : प्रतिनिधी

नाशिक महापालिकेच्या पंचवार्षिक  निवडणुका कधी होणार याची अद्याप शाश्वती नसली तरी निवडणुका लागल्यास मतदारांपर्यंत पोहोचण्यास अडचण नको म्हणून महत्त्वाकांक्षेचे धुमारे फुटलेले इच्छुक आतापासूनच निवडणुकीच्या तयारीला लागल्याचे चित्र आहे. विविध प्रकारचे सण, समारंभ अथवा उदघाटन कार्यक्रमाचे प्लेक्स लावताना फोटो लावून त्याखाली भावी नगरसेवक असा उल्लेख केला जात असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

महापालिकेच्या निवडणुका कधी होणारयाबाबत अद्याप अनिश्‍चितता आहे. त्यातच 2024 मध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुका असल्याने आमदार आणि खासदारकीसाठी इच्छुक असलेल्यांच्या बॅनरची भरच पडली आहे.परिणामी मराठी नवीन वर्ष अर्थात गुढीपाडवा तसेच रामनवमीच्या शुभेच्छांचे बॅनर शहरातील विविध भागात झळकले.  ते बॅनर वेगवेगळ्या पक्षांच्या पदाधिकारी ,माजी नगरसेवक यांचे आहेत. मात्र पक्ष वेगळा असला तरी   बॅनरवरील एक मजकुर मात्र समान आहे. तो मजकूर म्हणजे भावी नगरसेवक ,भावी आमदार ते भावी खासदारांचे बॅनर सध्या शहरात झळकत  आहेत.  त्यामुळे निवडणुकांना अवकाश असला तरी बॅनरमधून पक्षश्रेष्ठींना आपणही इच्छुक असल्याचा संदेश देण्याचे काम इच्छुक करत आहेत.  या बॅनरमुळे पक्षांतर्गत  वाद ही उफाळून येत आहेत. एकाच प्रभागात एकाच पक्षाचे दोन चार इच्छुक असल्याने निवडणुकीच्या आधीच पक्षांतर्गत वादाला सुरवात होत आहे. 2017 ते 2022 या पंचवार्षिक कालावधीत नगरसेवक असणार्‍यांची  मात्र आपल्याच पक्षातील अनेकांचे भावी नगरसेवक बॅनर पाहून डोकेदुखी वाढली आहे.  आगामी वर्षभरात होऊ घातलेल्या निवडणूक तयारीच्या  रंगीत तालमींना सुरूवात झाली आहे.  येणार्‍या काळात नागरिकांना बॅनरच्या माध्यमातून अनेक भावी नगरसेवकांना पाहता येणार असुन नगरसेवक पदासाठी इच्छुक  उमेदवार मिळालेल्या संधीचे सोने करत भावी नगरसेवक म्हणून आपले ब्रँडिंग करत असले..तरी नगरसेवक कोण होणार हे प्रभागातील नागरिकच ठरवणार आहेत.

 

 

 

Ashvini Pande

Recent Posts

साकोरा येथे गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठी चार्ज

गाडीत पैसे असल्याच्या संशयावरून राडा साकोरा येथे गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठी चार्ज नांदगांव /…

1 day ago

जुने नाशिक भागात आमदार फरांदे यांनी साधला सवांद

नाशिक : प्रतिनिधी नाशिक मध्यचे दोन्ही उमेदवार देवयानी फरांदे आणि वसंत गीते एकाच वेळी  आल्याने…

1 day ago

नांदगावमध्ये सुहास कांदे आणि समीर भुजबळांमध्ये राडा

नांदगाव: येथील मतदार संघात आज समीर भुजबळ आणि सुहास कांदे यांच्यात आज पुन्हा राडा झाला.…

1 day ago

यांनी बजावला मतदानाचा हक्क

नाशिक: लोकशाहीचा उत्सव असलेल्या मतदानास सकाळी 7 वाजेपासून सुरुवात झाली आहे, मतदानाचा हक्क बजावत अनेकांनी…

1 day ago

जिल्ह्यात पहिल्या दोन तासात ६. ८९ टक्के मतदान

  जिल्ह्यात पहिल्या दोन तासात ६. ८९ टक्के मतदान नाशिक मध्य मध्ये दोन तासात सर्वाधिक…

1 day ago

बनकर, कदम यांनी बजावला मतदानाचा हक्क

निफाड:- प्रतिनिधी निफाड विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उ बा ठा चे उमेदवार माजी आमदार अनिल कदम…

1 day ago