कारवाई करण्याची देशमुख यांची मागणी
मालेगाव : तालुक्यातील घोडेगाव शिवारात असलेल्या सुकी नदीपात्रातून गेल्या काही महिन्यांपासून वाळूचा अमर्याद उपसा सुरू आहे. यामुळे नदीपात्रात मोठ मोठे खड्डे पडले असून, वाळूचा हा अमर्याद उपसा तातडीने थांबविण्याची मागणी सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक ए.ए. देशमुख यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी जिल्हाधिकारी तसेच महसूल विभागाच्या सर्व संबधित अधिकार्यांना निवेदन दिले आहे. मालेगाव तालुक्यात घोडेगाव येथे सुकी नदी आहे.
या नदीला सद्या पाणी नाही. त्यामुळे याचा गैरफायदा घेत वाळूचा उपसा केला जात आहे. जेसीबीच्या सहाय्याने वाळूचा उपसा केल्यामुळे नदीपात्रात मोठमोठे खड्डे पडत असल्याने भविष्यात नागरिकांच्या जिवावर बेतू शकते. त्यामुळे हा वाळूचा उपसा थांबवावा, असे निवेदन देऊन एक महिन्याचा कालावधी उलटून गेला आहे. मात्र, संबधित विभागाने या निवेदनाची दखल देखील घेतलेली नाही. महसूल अधिकारी कर्मचारी आणि संबधित वाळू ठेकेदारांचे काही साटे लोटे आहे की काय? असा संशय यामुळे येत आहे. जिल्हाधिकार्यांनी तातडीने दखल घेऊन वाळूचा उपसा बंद करावा, अशी मागणी देशमुख यांनी केली आहे.
मुलींचा सांभाळ करण्याचा कंटाळा आल्याने आईने उचलले भयानक पाऊल शहापूर : साजिद शेख शहापूर…
मंत्री गिरीश महाजन यांचा एकनाथ खडसे यांना सवाल नाशिक : प्रतिनिधी पुण्यात रेव्ह पार्टीवर पोलिसांनी…
दि. 27 जुलै ते 2 ऑगस्ट 2025 पुरुषोत्तम नाईक मेष : आप्तेष्टांच्या गाठीभेटी या सप्ताहात…
मंत्री गिरीश महाजन : सुनील बागूल, राजवाडे यांचा अखेर भाजपमध्ये प्रवेश नाशिक ः प्रतिनिधी भारतीय…
दक्षिण भारत, मध्य प्रदेशातील कांद्याच्या आवकेने भाव गडगडण्याची शक्यता लासलगाव : समीर पठाण गेल्या काही…
नाफेडने जाहीर केले नवे कांदा खरेदी दर लासलगाव :- समीर पठाण गेल्या महिन्यापासून नाफेडच्या माध्यमातून…