वावी पोलिसांनी केली मोटारसायकल चोरांची टोळी जेरबंद
वावी: वार्ताहर
वावी पोलिसांनी दोडी गावातून मोटार सायकल चोरणाऱ्या टोळीस अटक केली आहे.
दोडी गावात रात्री १.३० च्या सुमारास पोलीस गस्त घालत असताना ३ मोटारसायकली दिसल्या. त्यांना गाडीची माहिती विचारली असता उडवाउडवीची उत्तरे दिल्याने पोलिसांना संशय आला त्यातील एक इसम पळून गेला तर संशयित अजित कानू मथे वय २१ रा.साकुर व विजय पाराजी गावडे वय १९ रा.साकुर यांना ताब्यात घेण्यात आले त्यांची चौकशी केली असता त्यांनी या मोटारसायकल चोरून आणल्याचे सांगितले. त्यांच्याकडून तीन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या असून या गाड्या सिन्नर पोलीस व एमआयडीसी पोलीस हद्दीत चोरी झाल्या असल्याची माहिती पोलिसांना दिली.पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन लोखंडे, उपनिरीक्षक विजय सोनवणे, बलसाने,नागरे,संदीप जाधव करीत आहे