नाशिक

रेल्वे प्रवासात टीसीची बॅग चोरणार्‍या चोरट्यास अटक

शिलापूर : प्रतिनिधी
रेल्वे प्रवासात तिकीट तपासणी (टीसी)ची बॅग चोरणार्‍या भामट्यास नाशिकरोड रेल्वे पोलिसांनी अटक करून सोन्याच्या दागिन्यांची चोरी उघडकीस आणून 95 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करत दोन गुन्हे उघडकीस आणण्यात यश मिळाले. याबाबत अधिक माहिती अशी की, 25 ऑगस्ट रोजी देवगिरी एक्स्प्रेसमध्ये ऑन ड्युटी टीसी अशोक कुमार यादव (रा. नाशिक) हे मनमाड ते -मुंबई अशी ड्युटी करीत असताना त्यांची रेल्वे डब्यात ठेवलेली काळ्या रंगाची बॅग त्याची किंमत अंदाजे एक हजार रुपये व त्यातील एक काळ्या रंगाचा रेल्वे टीसीचा कापडी कोट, बॅच, नेमप्लेट, आधार कार्ड, रेल्वेचे ओळखपत्र, ड्युटी पास, तक्रार पुस्तिका, जुने वापरते कपडे असा एकूण पाच हजार पाचशे रुपये किमतीचा माल कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांचे गैरहजेरीत चोरी केला होता.
सदरची तक्रार मुंबई येथे दाखल होऊन ती नाशिकरोड रेल्वे पोलिसांकडे वर्ग होऊन आल्याने नाशिकरोड येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या अनुषंगाने गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक फौजदार संतोष उफाडे पाटील, हवालदार शैलेंद्र पाटील, राज बच्छाव, आरपीएफ आरक्षक मनीष कुमार, सागर वर्मा, के. के. यादव हे प्रवासी रेल्वे एक्स्प्रेसवर गस्त घालत असताना, त्यांना एक इसम तेजस अजित छाबडा (रा. इगतपुरी, जि. नाशिक) हा दोन बॅग घेऊन रेल्वे स्टेशन नाशिकरोड येथे संशयितरीत्या फिरत असताना दिसून आल्याने त्यास ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता, फिर्यादी टीसी यांची बॅग त्याच्याकडे मिळून आल्याने व त्याने चोरी केल्याची कबुली दिल्याने दोन पंचांसमक्ष अटक करून मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याच्याकडे इतर गुन्ह्यांबाबत चौकशी करता त्याने 14 सप्टेंबर रोजी रेल्वे स्टेशन नाशिकरोड येथे अमरावती एक्स्प्रेसमधून एक बॅग उचलून त्यात मिळून आलेले सोन्याचे दागिने काढून दिले व गुन्हा कबूल केला. दाखल गुन्ह्याची पडताळणी केली असता पाच ग्रॅम सोन्याची अंगठी, पाच ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्रातील पेंडल, सहा ग्रॅमचे सोन्याचे मणी, दीडशे ग्रॅमचे पायल असे एकूण 95 हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. त्याच्याकडून दोन गुन्हे उघड करण्यात रेल्वे पोलिसांना यश आले. ही कामगिरी छत्रपती संभाजीनगर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उपविभागीय अधिकारी वसंत भोये यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी सचिन बनकर, उपनिरीक्षक राजेश सोनवणे, सहाय्यक फौजदार संतोष उफाडे पाटील, हवालदार शैलेंद्र पाटील, राज बच्छाव, रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक नवीन प्रताप सिंह, आरक्षक मनीष कुमार, के. के. यादव, सागर वर्मा यांनी केली.

 

Editorial Team

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

7 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

7 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

7 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

7 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

8 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

8 hours ago