पंचवटीत चोरट्यांनी लुटला साडेआठ लाखांचा ऐवज

पंचवटी : प्रतिनिधी
पोलिसांनी एकीकडे सराईत गुन्हेगारांविरुद्ध आक्रमक मोहीम उघडलेली असताना, दुसरीकडे चोरट्यांचा सुळसुळाट झाला आहे. पंचवटीतील विडी कामगारनगर, आडगाव शिवार तसेच मार्केट यार्ड परिसरात झालेल्या चोरी व घरफोडीच्या चार घटनांमध्ये चोरट्यांनी 8.50 लाखांचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी आडगाव, पंचवटी पोलिसांनी गुन्हे नोंदवले आहेत.
मोनिका नितीन भडांगे (30, रा. गोरक्षनाथ मंदिराजवळ, शिवस्वामी हाइट्स, विडी कामगारनगर) यांच्या फ्लॅटमध्ये शिरलेल्या चोरट्याने पर्समधून दोन लाख रुपये किमतीचा व 25 ग्रॅम वजनाचा सोन्याचा राणीहार चोरून नेला. आडगाव पोलीस ठाण्याचे हवालदार देसाई तपास करत आहेत. अमोल बळीराम पगार (32, रा. सीपीएम इस्टेट, वृंदावननगर, आडगाव शिवार) हे परिवारासह देवदर्शनाला गेले असता त्यांचे तसेच परिसरात राहणारे प्रवीण रत्नाकर परकाळे (महालक्ष्मी टॉवर, वृंदावननगर) यांच्या घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी 20 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, 10 ग्रॅम वजनाचा नेकलेस, 10 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन, झुमके, अंगठ्या असा 3 लाख 48 हजारांचा ऐवज लंपास केला. आडगाव पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. संकेत किसन खानोरे (41, रा. शिवओम बंगला, तपोवन रोड, पंचवटी) यांची मार्केट यार्डमध्ये शेतकरी व्हेजिटेबल कंपनी असून, ऑफिसच्या मुख्य दरवाजाची कडी कशाच्या तरी सहाय्याने उचकटून त्यावाटे आत प्रवेश करून ऑफिसमधील कॅशियरच्या टेबलच्या खालील कप्प्याचे लॉक तोडून त्यात ठेवलेली एकूण 2 लाख 80 हजार रुपये चोरी करून नेले.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *